Kartik Ekadashi 2021 Wishes in Marathi: कार्तिक एकादशी निमित्त मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात.
Kartik Ekadashi 2021 Wishes: कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीलाचं प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात. त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात. यंदा येत्या 14 नोव्हेंबरला कार्तिक एकादशी साजरी केली जाणार आहे.
कार्तिकी एकादशी दिवशी देव उठतात. त्यामुळे त्या एकादशीस देवउठनी एकादशी असेही म्हणतात. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत देवाची पालखी, मिरवणुका काढल्या जातात. तर कार्तिक एकादशी निमित्त शुभेच्छापत्र, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात. तसेच भजन-कीर्तनात दिवस घालवितात आणि विठ्ठलाची महापूजा करतात. कार्तिक एकादशीच्या दिवसापासून तुलसी विवाहासदेखील सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात.