Kargil Vijay Diwas 2022 Date and History: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाचा इतिहास, जाणून घ्या
1999 साली 74 दिवसांच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याला गुडघे टेकायला लावून पराभूत केले होते, या शौर्याचे प्रतीक म्हणून कारगिल दिवस साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास
Kargil Vijay Diwas 2022 Date and History: 26 जुलै हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. 1999 साली 74 दिवसांच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याला गुडघे टेकायला भाग पाडले आणि पाकिस्तानला पराभूत केले होते, या शौर्याचे प्रतीक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा केली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय वीरांच्या स्मरणार्थ देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस 2022 ची तारीख आणि संपूर्ण माहिती, जाणून घ्या
कारगिल विजय दिवस कधी आहे?
26 जुलै 1999 चा दिवस भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीमुळे इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. 26 जुलै रोजी भारताने कारगील युद्ध जिंकले होते. त्यामुळे 26 जुलै रोजी कारगिल दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्ध 1999 मध्ये संपले जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या पर्वतीय चौक्यांवर नियंत्रण मिळवले होते.
कारगिल विजय दिवसाचा इतिहास
पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. यानंतर घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुमारे अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळ चालले. काश्मीर मुद्यामुळे हि घुसखोरी करण्यात आली होती. काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ज्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये स्वाक्षरी देखील केली होती. परंतु पाकिस्तानने घुसखोरी केली आणि भारतातील अनेक भाग ताब्यात घेतला. मे 1999 मध्ये, पाकिस्तानी सशस्त्र दलांनी काश्मीर आणि लडाखमधील दुवे तोडण्यासाठी नियंत्रण रेषेत (LOC) प्रवेश केला ज्यामुळे भारताला काश्मीर वादावर तोडगा काढण्यास भाग पाडले जाईल. अशाप्रकारे, त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि नियंत्रण मिळविण्यासाठी मोक्याचे ठिकाण आणि पर्वतरांगा ताब्यात घेतले. भारत सरकार लवकरच कृतीत आले आणि 'ऑपरेशन विजय'ने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.
पहिल्या टप्प्यात पाकिस्तानी सैन्याने टायगर हिल आणि इतर चौक्यांवरून भारतीय हद्दीत आक्रमण केले. दुसऱ्या टप्प्यात भारतीय लष्कराने वाहतूक मार्ग ताब्यात घेऊन आणि पाकिस्तानी आक्रमणाचे ठिकाण ओळखून प्रत्युत्तर दिले. कारगिल युद्धाच्या अंतिम टप्प्यात भारतीय हवाई दलाच्या मदतीने पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्याची मोहीम भारतीय लष्कराला पूर्ण करता आली. 26 जुलै 1999 रोजी लष्कराने पाकिस्तानवर भारताचा विजय घोषित केला. तथापि, युद्धात भारताचे 527 सैनिक शहीद झाले होते. तर युद्धात 453 नागरिकांचाही मृत्यू झाला होता. कॅप्टन विक्रम बत्रा हे शहीद झालेल्या शूर सैनिकांपैकी एक होते. जे देशासाठी लढताना शहीद झाले होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च शौर्य देण्यात आला होता.
2022 ला कारगिल विजय दिवस कसा साजरा केला जाणार, जाणून घ्या
भारताचे पंतप्रधान इंडिया गेटवर अमर जवान ज्योती येथे शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. यावर्षी कारगिल विजय दिवसाचा 23 व्या वर्धापन दिनानिमित्त युद्धस्मारकावर ध्वजारोहण समारंभासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असुन स्मृतीस्थळावर शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचेही नियोजन आहे.