Kamala Ekadashi 2020: 3 वर्षातून एकदाचं येते 'कमला एकादशी'; जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी

मात्र, अधिक मासातील एकादशीचे महत्त्व अधिक मानले गेले आहे. अधिक मासातील दोन्ही पक्षातील एकादशीला कमला एकादशी (Kamala Ekadashi) म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाते. रविवारी म्हणजेच 27 सप्टेंबरला कमला एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या एकादशीलाचं पुरुषोत्तम एकादशी असेही म्हटले जाते. अधिक महिना हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. आज या खास लेखातून आपण कमला एकादशीच्या दिवशी करायचे व्रत आणि पूजाविधी जाणून घेऊयात.

Lord Vishnu (Photo credits: Facebook)

Kamala Ekadashi 2020: हिंदू धर्मामध्ये तसेच वारकरी संप्रादयामध्ये एकादशी तिथी विशेष मानली जाते. मात्र, अधिक मासातील एकादशीचे महत्त्व अधिक मानले गेले आहे. अधिक मासातील दोन्ही पक्षातील एकादशीला कमला एकादशी (Kamala Ekadashi) म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाते. रविवारी म्हणजेच 27 सप्टेंबरला कमला एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या एकादशीलाचं पुरुषोत्तम एकादशी असेही म्हटले जाते. अधिक महिना हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. आज या खास लेखातून आपण कमला एकादशीच्या दिवशी करायचे व्रत आणि पूजाविधी जाणून घेऊयात.

कमला एकादशी व्रत आणि पूजा विधी -

दरम्यान, द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर ब्राह्मणांना जेवण आणि दक्षिणा द्यावी. कमला एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वादाचा लाभ मिळतो, असं म्हटलं जातं. पुरुषोत्तम एकादशीचे व्रत करणाऱ्यांना हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, असं पौराणिक कथेत म्हटलं आहे. याशिवाय हे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते.