Janmashtami 2020 Rangoli Designs: जन्माष्टमी निमित्त दारात आणि देवासमोर काढा 'अशी' सोप्पी आणि सुंंदर रांगोळी (Watch Video)
यासाठी काही रांगोळी ट्युटोरियल व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी एकत्र आणले आहेत. चला तर मग पाहुयात..
Janmashtami 2020 Special Rangoli Designs: यंदा ग्रेगेरियन कॅलेंडनुसार आज 11 ऑगस्टच्या मध्यरात्री हा श्री कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) म्हणजेच कृष्ण जयंतीचा (Krishna Jayanti) सोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) हा सण गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून देखील ओळखला जातो. यानिमित्ताने अनेक घरोघरी कृष्णाचे पुजन करुन दिवसभर व्रत केले जाते. कोणताही सोहळा किंंवा व्रत म्हंंटल्यास रांगोळीला विशेष स्थान आहे. घरात चैतन्याचे,उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दाराबाहेर किंवा देवापुढे एक छोटीशी रांगोळी सुद्धा मोठे काम करते. आज च्या कृष्ण जन्माष्टमी निमित्त अशाच सोप्प्या सुंंदर रांगोळ्या काढुन तुम्हीही श्री कृष्णाचा जन्मसोहळा साजरा करु शकतो. यासाठी काही रांगोळी ट्युटोरियल व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी एकत्र आणले आहेत. चला तर मग पाहुयात..
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा
जन्माष्टमी विशेष रांगोळी डिझाईन
दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मंदिरामध्ये साजरा होणारा कृष्ण जन्माचा सोहळा रद्द झाला असला तरीही घरोघरी भाविक पाळणा सजवून भगवान कृष्णाचा जन्मदिवस साजरा नक्की करा, सर्व कृष्ण भक्तांना जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा!