IPL Auction 2025 Live

Jagannath Rath Yatra 2020 Live Streaming on OTV and DD Odia: जगन्नाथ पुरी रथ यात्रा घरबसल्या अनुभवण्यासाठी इथे पहा थेट प्रक्षेपण!

याच पार्श्वभूमीवर ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेलाही (Jagannath Rath Yatra 2020) मोठा फटका बसला आहे.

Jagannath Puri Rath Yatra (Photo credits: Twitter/Naveen Jindal)

Jagannath Puri Rath Yatra 2020 Live Streaming On Television: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेमध्ये  (Jagannath Rath Yatra 2020) यंदा  कोरोनामुळे बदल  करण्यात आले आहेत. आज (23 जून) जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होणार आहे. परंतु, लोकांची गर्दी न करता, करोना चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या पुजाऱ्यांना परवानगी देत ही रथयात्रा आणि पुरी मधील प्रसिद्ध चेरियट उत्सव पार पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त  परवानगी दिली आहे.  यंदा दरवर्षी प्रमाणे जगन्नाथ रथयात्रेला उपस्थितीत राहू न शकणार्‍या भाविकांसाठी घरबसल्या जगन्नाथ यात्रेचे लाईव्ह दर्शन टेलिव्हिजनवर आणि ऑनलाईन माध्यमातून घेता येणार आहे.  OTV आणि DD Odia या चॅनेलवर ही रथयात्रा आणि भगवान जगन्नाथांचे दर्शन घेता येईल. दरम्यान या काळात पुरी मध्ये सोमवार (22 जून)  रात्री 9 पासून  बुधवार (24 जून) रात्री 2 वाजेपर्यंत 'कर्फ्यू' प्रमाणे कडक संचारबंदी लागू आहे.

हिंदु दिनदर्शिकेनुसार आषाढी महिन्याच्या दुसर्‍या दिवशी जगन्नाथ यात्रा काढली जाते. दरम्यान, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तिन्ही देवतांची रथ यात्रा काढली जाते. जगन्नाथ रथाला नंदीघोष आणि बलभद्र रथला तलध्वजा तर, सुभद्राच्या रथला पद्मध्वजा अशी नावे दिली गेली आहेत. यावर्षी, जगन्नाथ यात्रा 23 जून 2020 रोजी होणार आहे. 13 व्या शतकात या रथयात्रेला सुरुवात झाली होती असे इतिहासकार सांगतात. गेल्या 284 वर्षात कधीही ही यात्रा रद्द करण्यात आलेली नाही. परंतू, कोरोनाचे संकट गडद होत असल्यामुळे भाविकांना यावर्षी जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होता येणार नाही. अशा भाविकांना ओ.टी.व्ही आणि डी.डी ओडिया या चॅनलच्या माध्यामातून जगन्नाथ यात्रेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. हे देखील वाचा- राशीभविष्य 23 जून 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

इथे पहा जगन्नाथ रथ यात्रा 2020 चे लाईव्ह-

सर्वोच्च न्यायालयाने करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता रथयात्रेवर स्थगिती आणली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालायने परवानगी दिली आहे. याचबरोबर रथ, यात्रेदरम्यान पारंपारिक विधीमध्ये फक्त आवश्यक लोकांना परवानगी दिली जाणार आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यामध्ये मंदिर समितीचे पंडे, अधिकारी व पोलिसांचा सामवेश आहे. महत्वाचे म्हणजे, रथ यात्रेत सामील होणाऱ्या व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असायला पाहिजे, अशा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.