International Yoga Day 2019: हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करणा-या सेतू बंधासनाचे काय आहे महत्त्व, ऐका खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून(Watch Video)
येत्या 21 जूनला येणा-या आंतरराष्ट्रीय योगा दिवस च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ऑनलाईन सिरीजमध्ये आज सेतू बंधासनाचे (Setu Bandhasana) फायदे आणि हे आसन कसे करायचे आहेत हे सांगितले आहेत.
योगाचे (Yoga) सांगावे तितके फायदे कमीच आहे. योग हे एक शास्त्र आहे. हे ज्यांना अवगत झाले त्यांना आय़ुष्यात शरीराविषयी संबधित आजारावर लढण्याची ताकद मिळतो. किंबहुना आजार होत नाही. पण त्यात नेहमी सातत्य राहणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. येत्या 21 जूनला येणा-या आंतरराष्ट्रीय योगा दिवस च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ऑनलाईन सिरीजमध्ये आज सेतू बंधासनाचे (Setu Bandhasana) फायदे आणि हे आसन कसे करायचे आहेत हे सांगितले आहेत.
सेतू बंधासनामुळे तुमच्या पाठीच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच या आसनामुळे आपली पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर हृदयाची कार्यक्षमताही वाढवते. पाहा व्हिडिओ
मोदींच्या या योगा ऑनलाईन सिरीजचा लोकांना फायदा होणार असून हे नक्कीच त्याच्या आरोग्यासाठी हितावह आहे असे म्हणता येईल.