International Women's Day 2019: महिलांना आहेत हे '8' खास अधिकार!

महिलांनो! तुमच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या काही महिलांना असलेल्या विशेष अधिकारांबद्दल वेळीच जाणून घ्या.

Woman (Photo Credits: File Photo)

8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस ( International Women's Day 2019) म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर महिलांचे सबलीकरण व्हावे याकरिता या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. यंदा 8 मार्च 2019 हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस 'Think Equal, Build Smart, Innovate for Change या थीमवर आधारित आहे. अनेकदा स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करून कुटुंबातील इतर व्यक्तींना, त्यांच्या गरजांना प्राधान्य देतात. त्यामुळे नकळत महिलांच्या आरोग्यापासून ते शैक्षणिक, करियरमधील प्रगती खुंटते. अनेकदा महिलांना त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांची पुरेशी माहिती नसल्याने नुकसान होते. अन्याय करण्यापेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी असतो. म्हणूनच महिलांनो! तुमच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या काही महिलांना असलेल्या विशेष अधिकारांबद्दल वेळीच जाणून घ्या.

महिलांना असलेले विशेष अधिकार कोणते?

  • सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक होऊ शकत नाही.

महिलांना सूर्यास्तानंतर किंवा सुर्योदयापूर्वी अटक होऊ शकत नाही. काही अपवादात्मक स्थितीमध्ये तसे करायचे झाल्यास न्यायालयाकडून संबंधित परवानगी असणं आवश्यक आहे.

  • कोठेही FIR करण्याची सोय

शक्यतो जेथे गुन्हा घडतो तेथेच तक्रारदारांनी FIR दाखल करावी असा नियम आहे. मात्र महिला तक्रारदार याला अपवाद आहेत. आरोपी मोकाट सुटू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयानेच महिलांना शक्य तेथे जवळच्या पोलिस स्थानकामध्ये FIR दाखल करण्याची सोय दिली आहे. नंतर FIR संबंधित पोलिस स्थानकांमध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते.

  • 'पाळत' (stalk)ठेवल्याची तक्रार करण्याची सोय

IPC Section 354D अन्वये जर एखादी व्यक्ती (स्त्री / पुरूष) महिलेला जबरदस्ती काही वैयक्तित संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्यास, त्याच्याविरूद्ध तक्रार करण्याची सोय आहे. तसेच इंटरनेट, इमेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या आधारे मॉनिटर करत असल्यास महिला त्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकते. वारंवार आणि स्पष्टपणे हा प्रकार टाळाण्यास सांगूनही समोरची व्यक्ती ऐकत नसल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

महिलांना मोफत कायदेशीर सल्ला

Legal Services Authorities Act नुसार, बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पीडित महिलेला कायदेशीर मदत आणि वकील मोफत पुरवण्याची सोय आहे.

  • समान मोबदला

Equal Remuneration Act नुसार कामाच्या ठिकाणी मोबादला देताना स्त्री आणि पुरूष असा भेदभाव करता येऊ शकत नाही. एखादं काम करताना पुरूषाला जितका मोबदला असतो तितकाच मोबदला स्त्रीलादेखील देणं बंधनकारक आहे.

  • कामाच्या ठिकाणी त्रास होत असल्यास आवाज उठवा

कामाच्या ठिकाणी त्रास किंवा कोणताही लैंगिक छळ झाल्यास त्याची तक्रार दाखल करण्याची सोय आहे. Internal Complaints Committee मध्ये महिला तीन महिन्याच्या आतमध्ये लेखी तक्रार करू शकतात.

  • घरगुती अत्याचाराविरूद्ध आवाज

Section 498 अंन्वये घरामध्ये रहाणारी स्त्री मग ती पत्नी, बहीण, लिव्ह इन पार्टनरमधील महिला किंवा हाऊसवाईफ जर तिला लैंगिक, आर्थिक, शाब्दीक आणि मानसिक अत्याचार होत असल्यास दाद मागू शकते. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीवर अजामीनपात्र जन्मठेप तीन वर्षांपर्यत होऊ शकते. तसेच दंड आकारला जाऊ शकतो.

  • लैंगिक अत्याचारामध्ये ओळख निनावी ठेवण्याची सोय

लैंगिक अत्याचारामध्ये संबंधित पीडित महिलेची ओळख गुप्त ठेवण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. यामध्ये महिला पोलिस ऑफिसरच्या समोर तक्रार करण्याची मुभा आहे.

यंदा महिला दिनाचं सेलिब्रेशन करताना केवळ आनंद शेअर करू नका तर त्यासोबतीनेच महिलांना त्यांचे हक्क ठाऊक असणं अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कायदेशीर तरतुदींची माहिती असणंदेखील आवश्यक आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now