International Mother Language Day 2020: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्यामागे हा आहे इतिहास

संयुक्त राष्ट्राकडून (UN) 2000 पासून या दिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं.

Matribhasha Diwas | File Photo

Matribhasha Diwas 2020:  International Mother Language Day म्हणजेच जागतिक मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राकडून (UN) 2000 पासून या दिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं. आज झपाट्याने बदलत असलेल्या युगात अनेक जुन्या भाषा नष्ट होत आहेत. त्यामुळेच समाजात भाषेतील आणि संस्कृतीमधील विविधता जपण्यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी एका विशिष्ट थीमवर या दिवसाचं सेलिब्रेशन आधारित असतं. जगभरातील 6000 पैकी अनेक बोली भाषांचं अस्तित्त्व धोक्यात आलं आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये आज अत्यंत मोजक्या भाषेमध्ये शिक्षण उपलब्ध करून केलं जातं. मुलांच्या मानसिक, बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेमध्ये (Mother Tongue) होणं गरजेचे आहे. यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

जागतिक मातृभाषा दिवस का साजरा केला जातो?

भारत पाकिस्तानाच्या फाळणीमध्ये जागतिक मातृभाषा दिवसाच्या सेलिब्रेशनचं मूळ आहे. भारत- पाकिस्तानामध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा ही उर्दू असेल असे सांगण्यात आले. मात्र पश्चिम पाकिस्तान म्हणजे बंग्लादेशातील स्थानिकांना हे मान्य नव्हते. यासाठी त्यांनी मोहिम सुरु केली. 1956 साली बंगाली ही पाकिस्तानातील दुसरी अधिकृत भाषा झाली. या लढ्यात अनेकांनी बलिदानही दिले आहे.

जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेडण्यात आलेली ही विशेष मोहिम लक्षात घेता संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 फेब्रुवारी दिवशी जागतिक स्तरावर मातृभाषा दिवस साजरं करण्याचं ठरवलं. बांग्लादेशामध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस Language Movement Day किंवा Shohid Dibosh म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बांग्लादेशात सुट्टी असते. तर भारतामध्ये पश्चिम बंगाल भागामध्ये भाषा दिवस म्हणून 21 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो.

भारत सरकार कडून जागतिक मातृभाषा दिनाचं औचित्य साधत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या विचारावर आधारित खास कार्यक्रमाचं आयोजन केले जाणार आहे.