International Ice Cream Day 2019: मुंबईतील 5 उत्कृष्ट आइसक्रीम पार्लर जिथे तुम्हाला मिळतील भन्नाट आईस्क्रीम फ्लेवर्स
आज मुंबईतील अशी काही आईस्क्रीम पार्लर आहेत जिथे तुम्हाला नानाविध प्रकाराची, फ्लेवर्सची आईस्क्रीम्स मिळतील. आज 'जागतिक आईस्क्रीम दिवस' आणि रविवार म्हणजेच सुट्टीचा दिवस हा योग जुळून आल्या कारणाने आम्ही तुम्हाला मुंबईतील 5 उत्कृष्ट आईस्क्रीम पार्लर सांगणार आहोत.
रुसलेल्या मनविण्यासाठी, रडणा-या लहान मुलांना खूश करण्यासाठी, मूड चांगला करण्यासाठी ज्या गोष्टीचा आधार घेतला जातो ती म्हणजे सर्वांचे आवडते असे 'आइसक्रीम' (Ice Cream). आइसक्रीम हा एक अशी गोष्ट आहे जी लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते. जगात आइसक्रीमला कोणी नाही बोलेन असं म्हणणारी लोकं अगदी बोटावर मोजण्याइतकीच मिळतील. म्हणूनच आज जगभरात जागतिक आइसक्रीम दिवस साजरा केला जातो. जवळपास अडीज हजार वर्षांपूर्वी सिकंदर राजा आइसक्रीम ची सुरुवात केली. त्याने इजिप्त जिंकल्याच्या खुशीत आपल्या कारागीरांना आइसक्रीम बनविण्यास सांगितले होते. त्यानंतर आइसक्रीम हे हळू हळू प्रचलित होऊन अमेरिका, ब्रिटेन सारख्या देशांपासून प्रवास सुरु करत मुंबईपर्यंत पोहोचले.
आज मुंबईतील अशी काही आइसक्रीम पार्लर आहेत जिथे तुम्हाला नानाविध प्रकाराची, फ्लेवर्सची आइसक्रीम मिळतील. आज 'आंतरराष्ट्रीय आइसक्रीम दिवस' (International Ice Cream Day) आणि रविवार म्हणजेच सुट्टीचा दिवस हा योग जुळून आल्या कारणाने आम्ही तुम्हाला मुंबईतील 5 उत्कृष्ट आइसक्रीम पार्लर सांगणार आहोत.
1. शाही दरबार (बांद्रा)
बांद्रा पश्चिमेकडील कार्टर रोडवर हे आइसक्रीम पार्लर असून येथे तुम्हाला आइसक्रीमचे वेगवेगळे प्रकार चाखायला मिळतीत. त्यात स्मोकिंग बिस्किट आइसक्रीम, चॉकलेट ओव्हरडोस असे आइसक्रीमचे प्रकार ट्राय करायला मिळतील.
2. TIB - The Ice Cream Bakery(मुलूंड)
मुलूंड पश्चिमेला कालिदास नाट्यगृहाच्या विरुद्ध दिशेकडील रोडवर हे आइसक्रीम पार्लर दिसेल. येथे तुम्हाला फळांपासून बनवलेले बरेच आइसक्रीम प्रकार चाखायला मिळतील. तसेच मोका-मोका, ग्लासी चॉकलेटसह बटर क्रंच, न्यूयॉर्कर्स यांसारखे केक आइसक्रीमचा स्वाद देखील अनुभवयाला मिळेल.
3. बाबा फालुदा (माहीम)
बाबा फालुदा हे माहीमधील खूप जुने तसेच प्रसिद्ध असे आइसक्रीम पार्लर आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारचे आइसक्रीम फालुदा खायला मिळतील. ज्यात काजू फालुदा, रॉयल फालुदा, ब्लॅक करंट फालुदा यांसारखे भन्नाट प्रकार आहेत. त्यासोबत येथे तुम्हाला मिल्कशेक्स आणि आइसक्रीमचे विविध प्रकार चाखायला मिळतील.
4. ताज आइसक्रीम (मोहम्मद अली रोड)
मुंबईतील मोहम्मद अली रोडवर ताज आइसक्रीम पार्लर आहे. येथे तुम्हाला ताज्या फळांपासून बनवलेले आइसक्रीम, फालुदा तसेच मिल्कशेक ट्राय करायला मिळतील. ज्यात लिची, चिकू, सिताफळ सारखे अनेक प्रकार पाहायला मिळतील.
हेही वाचा- संत्र्याचा ज्यूस प्या, स्मरणशक्ती वाढवा
5. के. रुस्तम आइसक्रीम (चर्चगेट)
चर्चगेटमधील अॅम्बेसेडर हॉटेलच्या विरुद्ध दिशेकडील रोडवर हे आइसक्रीम पार्लर आहे. येथे तुम्हाला आइसक्रीम सँडविच, कॉफी क्रंच, चॉकलेट वॉलनट सारखे बरेच प्रकार मिळतील.
मग वाट कसली पाहाताय सुट्टीचा दिवस आहे, जोडीला हल्का पाऊस ही आहे. त्यामुळे आइसक्रीम खाण्याची मजा लुटायची असेल तर मुंबईतील हे आइसक्रीम पार्लरचे पर्याय तुम्हाला नक्कीच कामी येतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)