IPL Auction 2025 Live

Independence Day 2023 Date: यंदा 15 ऑगस्ट दिवशी भारत 76 की 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार

"Nation First, Always First" या थीमवर यंदाचे सेलिब्रेशन 15 ऑगस्ट दिवशी असणार आहे.

Indian Flag (Photo Credits: Pexels)

ब्रिटीश साम्राज्यामधून 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत देश स्वतंत्र झाला आहे. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. या दिवसानिमित्त देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आयुष्य वेचणार्‍या देशप्रेमींना आदरांजली अर्पण केली जाते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनची देखील आता तयारी सुरू झाली आहे. पण हा स्वातंत्र्यदिन नेमका 76 वा की 77 वा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुमचाही हा गोंधळ होत असेल तर जाणून घ्या भारत देश यंदा कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

भारताचा यंदा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने देशभर सारी सरकारी, खाजगी आस्थापनं, शाळा, कॉलेज बंद ठेवली जातात. भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजावंदन करतात. गल्लीपासून दिल्ली पर्यंत या निमित्ताने झेंडावंदन केले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभक्तीपर गाणी गाऊन हा दिवस साजरा केला जातो. नक्की वाचा: Independence Day 2023: तिरंगा फडकवताना आणि उतरवताना लक्षात ठेवा 'हे' नियम; काय आहे भारतीय ध्वज संहिता? जाणून घ्या .

यंदाचा स्वातंत्र्यदिन कितवा?

150 वर्ष पारतंत्र्यात राहिलेला भारत देश अखेर 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याची पहिली वर्षपूर्ती 15 ऑगस्ट 1948 दिवशी साजरी झाली. 2023 या वर्षी 76 वी वर्षपूर्ती असणार आहे. पण पहिला स्वातंत्रदिन देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हाच साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा भारतीय 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. म्हणजेच 76 वर्ष पूर्ण करत भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन आज 15 ऑगस्ट 2023 दिवशी आहे. "Nation First, Always First" या थीमवर यंदाचे सेलिब्रेशन असणार आहे.