Best Christmas Celebration Places in Mumbai: यंदा ख्रिसमस पार्टीचा आनंद घ्यायचा असेल तर मुंबईतील 'या' खास ठिकाणी द्या भेट

चला तर मग कोणती आहेत ही ठिकाण जाणून येऊयात.

St. Michael's Church (PC - X@CatholicFQ)

Best Christmas 2023 Celebration Places in Mumbai: मुंबई शहर स्वप्नांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ग्लॅमर, आकर्षक जीवनशैली आणि आधुनिकतेसाठी मुंबई हे जगभर प्रसिद्ध शहर मानले जाते. मुंबईत अशी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत, जी पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. गणेशोत्सव, नवरात्री, ख्रिसमस (Christmas 2023) किंवा नवीन वर्ष अशा इतर अनेक प्रसंगी मुंबई शहरात प्रचंड गर्दी असते. मुंबईतील ख्रिसमसचा उत्साह काही निराळाच असतो. नाताळ सणाला फार थोडे दिवस उरले आहेत. त्याची तयारी जगभर जोरात सुरू आहे. इतर देशांप्रमाणेच भारतातील अनेक शहरांमध्येही या विशेष प्रसंगी जल्लोषाचे वातावरण असते.

हा खास दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी आधीच देशाच्या विविध भागांना भेट देण्याची योजना आखली असेल. कोणी गोव्यात जाण्याच्या तयारीत आहेत तर कोणी केरळ किंवा कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही ख्रिसमसच्या निमित्ताने मुंबईला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी मुंबईतील ख्रिसमस सेलिब्रेशनच्या सर्वोत्तम ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग कोणती आहेत ही ठिकाण जाणून येऊयात. (हेही वाचा - December Vrat-Festival 2023: विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, ख्रिसमससह डिसेंबर महिन्यात साजरे होणार 'हे' प्रमुख उपवास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस)

सेंट मायकल चर्च - St. Michael's Church

St. Michael's Church (PC - X@CatholicFQ)

मुंबई हे असे शहर आहे जिथे एक नाही तर अनेक प्रसिद्ध चर्च आहेत. जसे की अफगाण चर्च, होली नेम कॅथेड्रल आणि माउंट मेरीज बॅसिलिका चर्च. ख्रिसमसच्या दिवशी या ठिकाणी भरपूर अ‍ॅक्टिव्हिटी असते. पण ख्रिसमसच्या दिवशी फिरण्याची आणि मौजमजा करण्याची जी मजा सेंट मायकल चर्चच्या आसपास इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही. ख्रिसमसच्या काही दिवस आधी या चर्चच्या आजूबाजूची ठिकाणे दिवे लावून नववधूसारखी सजवली जातात. अख्रिसमसच्या दिवशी प्रार्थनेनंतर लाखो लोक येथे भेट देण्यासाठी येतात. जवळपासच्या ठिकाणी संगीताचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.

जुहू चौपाटी - Juhu Chaupati

आपल्या सर्वांना माहित आहे की मुंबई केवळ भारतातच नाही तर जगभरातील रात्रीच्या जीवनासाठी आणि पार्टी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मुंबईच्या नाईट लाईफ आणि पार्ट्यांबद्दल चर्चा होते, तेव्हा जुहू चौपाटीचा उल्लेख नक्कीच होतो. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लाखो देशी-विदेशी पर्यटक येथे येतात. जुहू चौपाटीवर रात्री उशिरापर्यंत संगीताचा कार्यक्रम आणि पार्टीचे वातावरण असते. त्यामुळे यंदा तुम्ही ख्रिसमसनिमित्त बाहेर पार्टीसाठी जाण्याचा विचार करत असाल तर जुहू चौपाटी तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण ठरू शकतं.

मरीन ड्राईव्ह - Marine Drive

मुंबईतील मरीन ड्राईव्ह एक अशी जागा आहे जिथे ख्रिसमसच्या दिवशी सकाळपासूनच लोक जमायला सुरुवात होते. जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसे येथील पर्यटक ख्रिसमसच्या मूडमध्ये येऊ लागतात आणि जसजशी संध्याकाळ जवळ येते तसतसे येथील दृश्य बदलते. संध्याकाळ जवळ येताच पर्यटक नाताळच्या आनंदात तल्लीन होतात. बर्‍याच वेळा सांताक्लॉज मरीन ड्राईव्हवर येतो आणि सर्वांना भेटवस्तू देतो. अशा परिस्थितीत तुम्हालाही समुद्राच्या लाटांमध्ये ख्रिसमस साजरा करायचा असेल तर तुम्ही नक्कीच इथे पोहोचले पाहिजे.

ख्रिसमस साजरा करण्यासाठी मुंबईतील या ठिकाणांना भेट द्या -

सेंट मायकल चर्च, जुहू चौपाटी आणि मरीन ड्राइव्ह व्यतिरिक्त मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही अगदी उत्सहात ख्रिसमस साजरा करू शकता. इतर ठिकाणांप्रमाणेच लाखो देशी-विदेशी पर्यटक ख्रिसमसच्या संध्याकाळी मौजमजा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचतात.

याशिवाय हजारो लोक ख्रिसमस साजरा करण्यासाठी हॉटेल आणि बारमध्ये येतात. मुंबईतील ख्रिसमस पार्ट्या नेहमीच चर्चेचा विषय बनतात. तथापी, दरवर्षी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ख्रिसमस निमित्त खास शो ठेवला जातो. रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेली वास्तुकला मुंबईच्या समृद्ध इतिहासाची कहाणी सांगते.