Best Places To Visit For Christmas Celebration: ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील सर्वोत्तम
तुम्हीही ख्रिसमसच्या निमित्ताने कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे ख्रिसमसचा उत्सव अतिशय जोमात साजरा केला जातो. तुम्ही तिथे सुट्टीचा भरभरून आनंद घेऊ शकता.
Best Places to Celebrate Christmas in India: भारतात ख्रिसमस (Christmas 2023) हा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. भारतातील अनेक ख्रिस्ती ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री चर्चमध्ये उपस्थित राहतात. या दिवशी चर्च आकर्षकरित्या सजवले जातात. लोक या दिवशी प्रार्थना करतात. भारतातील अनेक लोक ज्याठिकाणी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्या ठिकाणी ख्रिसमसच्या निमित्ताने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जातात. ख्रिसमसच्या निमित्ताने उत्तर भारतात सामान्यतः खूप थंडी असल्याने शाळा, महाविद्यालयेही बंद असतात. त्यामुळे, लोकांना त्यांच्या सामान्य दिनचर्यापासून कोठेतरी शांत आणि उत्साही ठिकाणी जाण आवडतं.
तुम्हीही ख्रिसमसच्या निमित्ताने कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे ख्रिसमसचा उत्सव अतिशय जोमात साजरा केला जातो. तुम्ही तिथे सुट्टीचा भरभरून आनंद घेऊ शकता. ही ठिकाणे केवळ ख्रिसमसचे धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूच प्रतिबिंबित करत नाहीत तर समुद्रकिनाऱ्यावरील पक्षांपासून ते बर्फाच्छादित लँडस्केप्सपर्यंत विविध प्रकारचे अनुभव देतात, ज्यामुळे ते भारतातील संस्मरणीय ख्रिसमस उत्सवासाठी आदर्श ठिकाणे ठरत आहेत. चला तर मग भारतातील ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Best Christmas Celebration Places in Mumbai: यंदा ख्रिसमस पार्टीचा आनंद घ्यायचा असेल तर मुंबईतील 'या' खास ठिकाणी द्या भेट)
गोवा -
नाइटलाइफ आणि पोर्तुगीज प्रभावासाठी ओळखले जाणारे, गोवा हे भारतातील ख्रिसमस साजरे करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. ख्रिसमस निमित्त गोव्यात रंगीबेरंगी दिव्यांनी सजावट केली जाते. तसेच येथील अनेक चर्चमध्ये खास सजावट केली जाते. विशेषत: पणजी आणि मरगाव सारख्या शहरांमध्ये, मध्यरात्री आकर्षत सजावट करण्यात येते.
भारतातील ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांचे व्हिडिओ -
कोलकाता -
समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या कोलकाता शहरात ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शहरातील सणाच्या बाजारपेठा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पार्क स्ट्रीट ख्रिसमस कार्निव्हल एक चैतन्यपूर्ण आणि आनंदी वातावरण तयार करतात.
शिलाँग -
मेघालयची राजधानी शिलाँग हे नयनरम्य निसर्ग आणि विविध संस्कृतींसाठी ओळखले जाते. ख्रिसमसच्या वेळी सुंदर सुशोभित रस्ते आणि चर्चसह शहर आकर्षक दिसते. कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चन हे ख्रिसमसच्या उत्सवाचे प्रमुख ठिकाण आहे. (हेही वाचा - December Vrat-Festival 2023: विवाह पंचमी, मोक्षदा एकादशी, ख्रिसमससह डिसेंबर महिन्यात साजरे होणार 'हे' प्रमुख उपवास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस)
मुंबई -
मुंबईमध्येदेखील मोठ्या उत्साहात ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. वांद्रे येथील प्रतिष्ठित माउंट मेरी चर्च मध्यरात्री मोठ्या संख्येने उपासकांना आकर्षित करते. या सणानिमित्त कुलाबा आणि वांद्रे या शहरातील लोकप्रिय क्षेत्रे दिव्यांनी सजवली जातात. मुंबईतील रस्त्यावरील सजावट आणि कार्यक्रमांद्वारे तुम्ही ख्रिसमसचा आनंद अनुभवू शकता.
शिमला -
बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेले शिमला शहर ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. येथील क्राइस्ट चर्च ख्रिसमस निमित्त आकर्षकपणे सजवला जातो. ख्रिसमसच्या अनोख्या अनुभवासाठी तुम्ही बर्फाच्छादित लँडस्केपचा आनंद घेऊ शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)