Holi Special Puran Poli Recipes: होळी निमित्त खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळीच्या 'या' लज्जतदार रेसिपीज घरी नक्की ट्राय करा, Watch Videos
पण आपल्यापैकी अनेकांना पुरणपोळी नेमकी कशी बनवायची हे अजून नीटसे माहिती नाही. म्हणून काही सोप्या आणि हटके पुरणपोळी रेसिपीज:
Holi Special Food Recipes: 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असे म्हणत गावभर गाजावाजा करणा-या लोकांसाठी पुरणपोळी म्हणजे जिव्हाळ्याच्या विषय. महाराष्ट्रात अनेक सणांना पुरणपोळीचा बेत ठरतो. मात्र होळी (Holi) ला पुरणपोळी करण्याचा महिलावर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. पुरणपोळी ही खायला जितकी चमचमीत असते तितकाच जास्त वेळ ती बनवायला लागतो. पुरणापासून ते त्याच्या पिठाचे मिश्रण बनवणे हे थोडे वेळ खर्चिक करणारे काम असते. त्यामुळे सर्वसाधारण असा प्रकार सुट्टीच्या दिवशी किंवा सणांना जास्त बनवला जातो. त्यामुळे वर्षभरातून क्वचितच बनणारी पुरणपोळी जेव्हा घरी बनवली जाते तेव्हा घरातील सर्व लोक त्यावर तुटून पडतात.
सर्वसामान्यपणे मैद्याच्या पिठाची पुरणपोळी बनविली जाते. पण आपल्यापैकी अनेकांना पुरणपोळी नेमकी कशी बनवायची हे अजून नीटसे माहिती नाही. म्हणून काही सोप्या आणि हटके पुरणपोळी रेसिपीज:
-
पुरण न वाटता बनवलेली पुरणपोळी
हेदेखील वाचा- Holi 2020 Date: होळी कधी आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा
2. विदर्भातील पुरणपोळी
3. रव्याची पुरणपोळी
तव्यावरून डायरेक्ट तव्यावरून तुमच्या ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. कोण किती पुरणपोळ्या खातो यावर घराघरांत पैजाही लागतात. त्यामुळे घरच्यांना पुरणपोळी खाण्याच्या आनंदावर विरजण पडू नये आणि पुरणपोळीचा येत नाही म्हणून तुमचा बेत फसू नये यासाठी या रेसिपीज ट्राय करायला काही हरकत नाही.