IPL Auction 2025 Live

Hindu Samarajya Diwas 2019: हिंदू साम्राज्य दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या

त्यामुळे या दिवसाला आनंदनाम संवत् असे नाव देण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज (फोटो सौजन्य-फेसबुक)

Hindu Samarajya Diwas 2019: सन 1964 रोजी जेष्ठ शुल्क त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे या दिवसाला 'आनंदनाम संवत्' असे नाव देण्यात आले होते. महाराष्ट्रात पाच हजार फूट उंचीवर स्थित रायगडाच्या किल्ल्यावर हा भव्य राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज एक प्रखर हिंदू सम्राटाने नावारुपाला आले.

महाराष्ट्रात हा दिवस शिव राज्यारोहण उत्सव असे म्हटले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करतात. बालवयातच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेत आपले राज्य स्थापन करणार असल्याची मनोधारणा केली होती. तसेच स्वराज्यस्थापनाची इच्छा ही इश्वराची असल्याचे शिवाजी महाराज यांनी त्याचवेळी सांगितले होते.

(Shiv Jayanti 2019: शिवाजी महाराज यांची 'राजमुद्रा' म्हणजे बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि प्रेरणेचा आविष्कार)

राज्याभिषेक करण्यामागील हेतू भारतातील हिंदूंचे चरित्र आणि एका नव्या राज्याचा उदय या दोन मुख्य गोष्टी लक्षात घेऊन करण्यात आला होता. तसेच लोक त्यांना रयतेचा राजा म्हणून ओळखू लागले होते. शिवाजी महारांचे नेतृत्व आणि कार्य याचा प्रभाव सर्वत्र पडला होता. शत्रूला अचूक अद्दल घडवण्याची ताकद शिवाजी महाराज यांच्याकडे होती.