Hartalika 2021 Wishes: हरितालिका व्रताच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा देत मंगलमय करा दिवसाची सुरूवात
हरितालिका व्रताच्या शुभेच्छा आज सोशल मीडीयामध्ये फेसबूक ट्वीटर Instagram द्वारा देऊन इच्छित वर मिळावा म्हणून कामना करणार्या प्रत्येकीला देत तिच्या दिवसाची करा मंगलमय सुरूवात.
हिंदू धर्मांमधील प्रथा-परंपरेनुसार भाद्रपद शुक्ल तृतीया दिवशी हरितालिकेचं व्रत (Hartalika Vrat) करण्याची पद्धत आहे. कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया मनाजोगा वर मिळावा या इच्छेखातर हरितालिकेचं व्रत करतात. या दिवशी भगवान शंकर (Shiv Shankar) आणि उमा अर्थात पार्वतीचं (Parvati) पूजन केले जाते. दिवसभर उपवास करून त्यांची आराधना केली जाते. मग आज तुमच्या घरात देखील कुमारिका किंवा स्त्रिया हा उपवास करणार असतील तर त्यांना आजच्या हरितालिका व्रताच्या शुभेच्छा (Hartalik Wishes) देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून ही खास शुभेच्छापत्र शेअर करून आजच्या दिवसाची त्यांची सुरूवात प्रसन्न करू शकाल. (नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थी निमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून द्या या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा).
पुराणातील कहाण्यांनुसार, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री दिवशी ज्यांनी शंकराची उपासना केली नसेल त्यांना या एका दिवसाच्या व्रताने ते पुण्य मिळू शकते अशी धारणा आहे. (नक्की वाचा: Ganeshotsav 2021 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवात पहा महत्त्वाच्या दिवसांच्या तारखा!).
हरितालिकेच्या शुभेच्छा
माता उमाच्या भाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनजोगता वर
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव व्हावे प्रसन्न
पार्वतीने द्यावे सौभाग्यदान!
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
हरितालिका तृतीया शुभेच्छा
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर!
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रात हे शिव शंकर आणि पार्वती पूजनाचा उपवास हरितालिका व्रत म्हणून ओळखलं जातं तर दक्षिण भारतामध्ये गौरी हब्बा म्हणून हा दिवस पाळला जातो. प्रत्येक प्रांतानुसार हरितालिका व्रताचे वेगवेगळे नियम आणि रीती आहेत.