Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त Messages, Quotes, Whatsapp Status द्वारे योगप्रेमींना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि Greetings सोशल मीडियाच्या Facebook, Twitter, WhatsApp, Telegram, Instagram वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा.

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi (PC - File Image)

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi: निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगाचे फायदे खूप आहेत. योगामुळे साखर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते. अनेकदा लोकांना असे वाटते की, योगा केवळ शरीर लवचिक बनवण्यासाठी केला जातो, पण तसे नाही. योगाची अनेक आसने आहेत, ज्यांचे अनेक फायदे आहेत. योगाच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि निरोगी राहू शकता.

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. योगाचे महत्त्व ओळखून जगातील सर्व देश योग दिन साजरा करतात. योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि Greetings सोशल मीडियाच्या Facebook, Twitter, WhatsApp, Telegram, Instagram वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा. (हेही वाचा - Yoga Poses to Cure Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज करा 'हे' 5 योगासन, Watch Video)

आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे,

शांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे,

ते केवळ योगामुळेच मिळते

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi (PC - File Image) 

नियमित करा योग

आयुष्यभर दूर ठेवा रो

Happy International Yoga Day!

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi (PC - File Image)

योग आहे आरोग्याची क्रांती,

नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती

योग दिनाच्या शुभेच्छा…!

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi (PC - File Image)

सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग

तुमच्या जवळ येणार नाही रोग

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi (PC - File Image)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी

यांची सांगड घालणारा योग

तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो!

योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Yoga Day 2022 Wishes in Marathi (PC - File Image)

आज जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगासने करत आहेत. कोरोनाच्या काळात योगाचे महत्त्व आणखी वाढले. जेव्हा कोविड लॉकडाऊनमुळे जीम बंद होत्या त्यावेळी लोक मन शांत राहण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक घरी योगासने करत. मात्र हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची सुरुवात 2015 साली झाली.