Happy World Music Day 2020 Images: जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी Greetings, Wallpapers!
जॅक लो यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. फ्रान्समध्ये या दिवसाला ‘फेटे डे ला म्यूसिक’ असे म्हटले जाते.
संगीत ही एक अशी कला आहे ज्यामध्ये सुरावटीला भाषेच्या, भौगोलिक स्थितीच्या सीमा ओलांडून लोकांच्या काळजाला हात घालण्याचं वरदान आहे. त्यामुळे संगीताचा कंटाळा येईल अशी व्यक्ती क्वचितच आढळेल. आनंंद, दु:ख कोणत्याही भावनांना वाट मोकळी करून देण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये आहे. म्हणूनच केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून नव्हे तर थेरपी म्हणून देखील संगीताकडे बघितलं जातं आणि या संगीताचं सेलिब्रेशन वर्ल्ड म्युझिक डे (World Music Day) म्हणून 21 जून दिवशी केलं जातं. आज जगभरात जागतिक संगीत दिवस साजरा केला जात आहे या दिवसाचा आनंद तुमच्या नातेवाईकांसमवेतही शेअर करण्यासाठी, खास वर्ल्ड म्युझिक डे च्या शुभेच्छा देण्यासाठी ही शुभेच्छापत्र सोशल मीडीयात Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images, Greetings डाऊनलोड करू शकता.
जागतिक संगीत दिनाची सुरुवात, 1982 मध्ये फ्रान्समध्ये झाली, तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्री. जॅक लो यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. फ्रान्समध्ये या दिवसाला ‘फेटे डे ला म्यूसिक’ असे म्हटले जाते. सर्वात प्रथम लोकप्रिय फ्रेंच संगीत दिग्दर्शक ‘मॉरीश फ्लेरेट’ व ‘जॅक लँग’ यांनी हा दिवस साजरा करण्याची प्रथा फ्रान्समध्ये सुरु केली.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा
संगीताचे आज विविध प्रकार लोकप्रिय आहे. भारताची शान असलेल्या अभिजात संगीतामध्येही अनेक प्रकार, उप प्रकार आहेत. काळानुरूप त्यामध्ये बदल झाले आहेत. पण सांस्कृतिक वसांचा एक भाग असलेल्या या संगीतामध्ये आता तंत्रज्ञानाची देखील एंट्री झाल्याने तो जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात पोहचला आहे आणि तो जतन करण्यचा आता अधिक चिरकाळ प्रयत्न कलाकार आणि रसिक दोन्ही बाजूंकडून होत आहे.