Happy Women's Day: जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांकडून सर्व महिलांना शुभेच्छा! (Video)

आजच्या दिवसाचे महत्व जपत पोलीस वर्दीतील महिलांनी सुद्धा प्रत्येक महिलेसाठी जागतिक महिला दिनानिमित्त खास संदेश दिला आहे.

Women's Day Wishes From Mumbai Police (Photo Credits-Twitter)

Happy Women's Day: 'अरे संसार संसार,दोन जीवांचा विचार देतो सुखाला नकार आणि दु:खाला होकार'. अशा पद्धतीचे जीवन प्रत्येक स्री समाजात जगत असते. तिच्यावर असलेल्या जबाबदारींची काळजी घेत स्वत:ला समाजात सावरण्याचा तिचा प्रयत्न नेहमीच चालू असतो. म्हणूनच जागतिक महिला दिन(८ मार्च) हा स्रियांनी इतिहासात घडवून आणलेल्या कामगिरींचे गुणगौरव व्हावे तसेच स्रियांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून या दिनाला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व जपत मुंबईतील पोलीस वर्दीतील महिलांनी सुद्धा प्रत्येक महिलेसाठी जागतिक महिला दिनानिमित्त खास संदेश दिला आहे.

वर्दीमधील महिला ही प्रत्येक वेळी आपल्या परिवाराला संभाळात आयुष्याचा गाडा पुढे यशस्वीपणे घेऊन जात असते. तसेच पोलीस महिला यांना फार कमी वेळ मिळतो आपल्या परिवारासोबत वेळ घालवायला. मात्र तरीही आपल्या मायेच्या जोरावर ती नेहमी सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. हिच विचारधारणा ठेवून आज महिला पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी दक्ष राहून आपली वर्दीतील भुमिका यशस्वीपणे बजावत असते.

आजच्या जागतिक स्तरावर महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते. सध्याची परिस्थीती पाहता स्रीने आपल्या कलागुणांच्या व दृढ इच्छाशक्तीच्या आधाराने स्वत:ची समाजात नवी ओळख आणि स्वत:चे एक निराळे विश्वच तयार केले आहे. स्री ही समाजाची आता एक अविभाज्य घटक बनली आहे हे प्रत्येक स्री अभिनाने जगासमोर सांगू शकते.