Happy Vat Purnima 2025 Messages: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत खास करा तुमच्या पत्नीचं वट सावित्री व्रत
वटपौर्णिमा हा सण नववधूंसाठी अजूनच खास असतो. या सणाच्या निमित्ताने पहिलीच वटपौर्णिमा असलेली महिला नटून थटून वडाची पूजा करते.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिंदू महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचं व्रत करतात. महाराष्ट्रात यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima) 10 जून 2025 दिवशी साजरी केली जाणार आहे. वटसावित्री हे व्रत 3 रात्रीचं असतं. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करण्याची पद्धत आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी सवाष्ण महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा ही प्रार्थना करत वटपौर्णिमा साजरी करतात. मग यंदा तुमच्याही वटापौर्णिमेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Wishes यांच्या माध्यमातून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा शेअर करू शकता.
वटपौर्णिमा हा सण आनंदाचा, उत्साहाचा असतो. पावसाच्या दिवसांमध्ये सणांची रेलचेल ही याच वटपौर्णिमा सणा पासून होते. वडाच्या झाडाला सात फेर्या मारून वडाची पूजा केली जाते. सवाष्ण महिला या दिवसानिमित्त एकमेकींना वाण देऊन हा सण साजरा करतात. Vat Purnima Vrat 2025 Date and Timings: यंदा वटपौर्णिमा कधी? जाणून घ्या वडाच्या पूजा विधीची तारीख, वेळ काय?
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा






वटपौर्णिमा हा सण नववधूंसाठी अजूनच खास असतो. या सणाच्या निमित्ताने पहिलीच वटपौर्णिमा असलेली महिला नटून थटून वडाची पूजा करते. घरातील थोरा मोठ्यांचे आशिर्वाद घेते. आजकाल अनेक पतीही पत्नीसोबत या सणामध्ये सहभागी होतात. पत्नीचा हा सण आनंददायी करण्यासाठी त्यांना भेटवस्तू देतात.
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 3411 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

