Happy Vat Purnima 2020 Messages: वटपौणिमा मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook वर शेअर करत साजरा करा वटसावित्री व्रताचा खास दिवस!

यंंदा वटपौणिमा विशेष खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images असणारी ही शुभेच्छापत्र Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करुन हे वट सावित्रीचे व्रर साजरे करा.

Vat Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

Vat Purnima 2020 Marathi Messages: वटपौर्णिमा (Vat Purnima Vrat) सण यंदा 5 जून रोजी साजरा होणार आहे. वडाच्या झाडाला फेऱ्या मारून, वाण लुटून, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत हा सण साजरा केला जातो. यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या (Savitri- Satyavan) पातिव्रत्याचे हे प्रतीक आहे. यंदा कोरोनाच्या (Coronavirus)  संकटामुळे अगदी शक्य नसल्यास वडाच्या झाडाची पूजा करण्याचा हट्ट ठेवू नका. त्याऐवजी घरातच देवाची पूजा करून आपले व्रत करू शकता . व्रताचा मूळ हेतू हा पती-पत्नीच्या संबंधाला दृढ करणे असाही आहे त्यामुळे आपल्या पतिराजांसोबत घरातच वेळ घालवून तुम्ही खऱ्या अर्थाने सण साजरा करू शकाल. या दिवशी आपल्या नातेवाईकांतील, ऑफिस मधील, ट्रेन मधील किंवा इतरत्र असणाऱ्या सर्व मैत्रिणींना सुद्धा खास मराठी संदेश पाठवून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. यासाठी वटपौणिमा विशेष खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images असणारी ही शुभेच्छापत्र Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करता येतील. (हेेेही वाचा Happy Vat Purnima 2020 Wishes: वटपौर्णिमेनिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून साजरा करा या सणाचा आनंद!)

वटपौर्णिमा साजरी करण्यामागे अनेक मान्यता आहेत. जसे की, स्कंद पुराणानुसार वड हा यज्ञवृक्ष म्हणून संबोधला जातो. वडाचे आयुष्य अधिक असते असेच अधिक आयुष्य आपल्या पतीला लाभावे अशी कामना ठेवून हे व्रत केले जाते. वटवृक्ष हा शिवरूपी मानला जातो. वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या रूपातून शिवरूपी पतीचीच पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होते असा या व्रतामागे विश्वास असतो. अशा या खास दिवसाच्या शुभेच्छाही खास असायलाच हव्यात हो ना..? त्यासाठीच पहा आणि शेअर करा खाली दिलेली ही वटपौर्णिमा मराठमोळी शुभेच्छापत्र

वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा

Vat Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

Vat Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

Vat Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

Vat Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

Vat Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

दरम्यान, जर का उद्या तुम्ही वटपौर्णिमा सण साजरा करायला बाहेर पडणार असाल तर तुमच्या आरोग्याची आधी काळजी घ्या. रेड आणि कंटेनमेंट झोन मध्ये तुमचा प्रभाग येत नसेल तरच बाहेर जा, मास्क लावून पूजा करा, पूजेवेळी सोशल डिस्टंसिंगचे चोख पालन करा.