Vasant Panchami 2021 Images: वसंत पंचमी दिवशी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शुभेच्छा द्या ज्ञानदेवता सरस्वतीच्या जन्मदिनाच्या!
हिंदू पुराण कथांनुसार, भगवान श्री कृष्णांनी प्रसन्न होऊन माघ शुक्ल पंचमीला तुझी पूजा,आराधना केली जाईल असा आशिर्वाद दिला होता.
माघ महिन्यामध्ये गणेश जयंती (Ganesh Jayanti) पाठोपाठ येणारा हिंदू धर्मियांसाठी अजून एक खास दिवस म्हणजे बसंत पंचमी (Basant Panchami). बसंत पंचमी किंवा वसंत पंचमी (Vasant Panchami) या दिवशी ज्ञानदेवता माता सरस्वतीचा जन्मदिन अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. या दिवशी सरस्वतीपूजन करण्याची प्रथा आहे. भारतामध्ये काही ठिकाणी या दिवशी पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारुन दिवसाची सुरूवात केली जाते. यानंतर पुन्हा हिंदू धर्मियांमध्ये लग्न सोहळे, शुभ कामांची सुरूवात केली जाते. दरम्यान महाराष्ट्रात वसंत पंचमीला पंढरपूरामध्ये विठ्ठल -रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा दरवर्षी पार पडतो. मग तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्र मंडळींना या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेजेस, फेसबूक मेसेजेस, Wishes, Messages, Stickers यांच्या माध्यमातून शुभेच्छा देत साजरा करा वसंत पंचमीचा खास दिवस!
मान्यतांनुसार, वसंत पंचमीच्या दिवशी लाल कपडे टाळले जातात. या दिवशी पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करून वसंत पंचमीचा आनंद द्विगुणित केला जातो. माता सरस्वती ही विद्या आणि बुद्धीची देवता आहे. हिंदू पुराण कथांनुसार, भगवान श्री कृष्णांनी प्रसन्न होऊन माघ शुक्ल पंचमीला तुझी पूजा,आराधना केली जाईल असा आशिर्वाद दिला होता.
वसंत पंचमीच्या शुभेच्छा
वसंत पंचमी दिवशी सरस्वतीला देखील पांढरी किंवा पिवळी फुलं अर्पण केली जातात. या दिवशी नैवेद्यामध्ये तिला दही दिलं जातं. तर सरस्वती पूजन हे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या नंतर अडीच तासांच्या वेळेमध्ये करण्याची प्रथा आहे.