ग्रीष्म ऋतु Google Doodle: दक्षिणायनाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गूगल चं खास Summer Season डूडल
या दिवशी सूर्य पहाटे लवकर उगवतो तर संध्याकाळी उशिरा मावळतो.
Summer Season 2019 Google Doodle: 21 जून या दिवसापासून उत्तरायण संपून दक्षिणायनाला सुरूवात होते. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. आज गूगलेही या दिवसाचं औचित्य साधून Happy Summer Season (ग्रीष्म ऋतु) म्हणत खास गूगल डूडल बनवले आहे. दक्षिणायनाच्या पहिल्या दिवसाशी ग्रीष्म ऋतुच्या शुभेच्छा त्यांनी हटके अंदाजात दिल्या आहेत. आजचा म्हणजे 21 जूनचा दिवस हा 13 तास 13 मिनिटांचा असतो. आजपासून उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. हा काळ 21 जून ते 23 सप्टेंबरचा असतो. Yoga Day 2019: 21 जून दिवशीच जागतिक योग दिन का साजरा केला जातो
20 जूनच्या रात्रीपासून पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने 11 हजार किमी प्रती तासाच्या वेगाने पश्चिम दिशेकडून पूर्वेला फिरते. सोबत पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. त्यामुळे 21 जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस ठरतो. या दिवशी सूर्य पहाटे लवकर उगवतो तर संध्याकाळी उशिरा मावळतो.
गूगल डुडलच्या माध्यमातून महत्त्वाच्या दिवशी खास डूडल साकारून शुभेच्छा दिल्या जातात. यामध्ये जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करणार्या व्यक्ती, विशेष दिवस, सण समारंभ यांचा समावेश असतो.