Happy Sister's Day 2023 Wishes in Marathi: सिस्टर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा आनंद!

Sisters Day | File Image

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस सिस्टर्स डे ( Sister's Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. यंदा हा सिस्टर्स डे 6 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. भारतीय कुटुंबांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती जपली जाते त्यामुळे सहाजिकच नात्यांमध्ये जिव्हाळा देखील अधिक असतो. आई नंतर हक्काने ओरडणारी पण तितकीच काळजी घेणारी, माया करणारी व्यक्ती म्हणजे ताई. बहीण जर लहान असेल तर ती घरातल्या सगळ्यांची लाडोबा असते. मग अशा लहान असो वा मोठ्या असो बहिणींप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस सिस्टर्स डे असल्याने या निमित्ताने तुमच्याही बहिणींना या सिस्टर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

बहीण ही घरात आईनंतर हक्काने प्रेम करणारी, काळजी करणारी व्यक्ती असते त्यामुळे तिचा आजचा दिवस नक्कीच खास करायला विसरू नका. यानिमित्ताने तिला एखादी भेट किंवा या शुभेच्छा सोशल मीडीयात शेअर करून त्यांचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

हॅप्पी सिस्टर्स डे 2023

Sisters Day | File Image

तोंडावर भांडत असलो तरी

मनात खूप प्रेम आहे

आईसारखी माया असलेली

माझ्या आयुष्यात  फक्त ताई आहे

Sisters Day | File Image

रडवायला सार्‍यांना जमतं

समजवायला सार्‍यांना जमत

पण रडवून समजवायला

फक्त माझ्या ताईला जमतं

हॅप्पी सिस्टर्स डे!

Sisters Day | File Image

फुलों का तारों का

सबका कहना है

एक हजारो मैं

मेरी बहना है!

Sisters Day | File Image

प्रत्येक बहिणीमध्ये

एक मैत्रिण आणि  आई लपलेली असते

सिस्टर्स डे च्या शुभेच्छा!

Sisters Day | File Image
Sisters Day | File Image

हॅप्पी सिस्टर्स डे!

बहिणीला काही जण ताई, अक्का, दीदी अशी आदराने हाक मारतात. मग आज त्यांच्यासाठी काही खास करून या दिवसाचा आनंद वाढवा. सिस्टर्स डे साजरा करण्यामागे नेमकं कारण नाही परंतू हा दिवस सोशल मीडीयातूनच अधिक लोकप्रिय झाला आहे. मग या निमित्ताने तुमच्या या हक्काच्या मैत्रिणीला स्पेशल वाटेल असं काही करायला विसरू नका.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif