Happy Shardiya Navratri 2020: घटस्थापना आणि नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Status द्वारा शेअर करत मंगलमय करा नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस!
आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेच्या भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही शुभेच्छापत्रं नक्की शेअर करू शकता.
Happy Shardiya Navratri 2020 Wishes in Marathi: महाराष्ट्रासह देशभरात आज, 17 ऑक्टोबर पासून घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरूवात होत आहे. यंदा कोरोना संकटाच्या प्रभावामुळे नवरात्र अत्यंत साधेपणाने साजरी केली जाईल. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव, गरबा यांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. हिंदू धर्मीयांचा घटस्थापना (Ghatasthapana) करून नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यास सुरूवात होते. मग या अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणारी सणासुदीची रेलचेल तुमच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या आयुष्यात आनंद, भराभराट घेऊन येवो या प्रार्थनेने आजचा दिवस सुरू करा. शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा आज व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक स्टेटस (Facebook Status), मेसेंजर याच्या माध्यमातून मराठमोळ्या शुभेच्छा, एसएमएस (SMS), ग्रीटिंग्स, मेसेजेस च्या माध्यतून शेअर करून त्यांचा नवरात्रोत्सव 2020 मधील पहिला दिवस मंगलमय करायला मदत करा. Ghatasthapana 2020 Shubh Muhurat Timing: शारदीय नवरात्री मध्ये यंदा घटस्थापना कशी कराल? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्ताची वेळ.
आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. आजपासून पुढिल नऊ दिवस नऊ रात्री दुर्गा मातेचं पुजन करून तिच्या विविध 9 रूपांची पुजा केली जाणार आहे. 25 ऑक्टोबरला दसर्याच्या दिवशी या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेच्या भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही शुभेच्छापत्रं नक्की शेअर करू शकता. Navratri Colours 2020 Full Schedule: शारदीय नवरात्री नऊरंगांचं मराठी वेळापत्रक तारखेनुसार इथे पहा आणि मोफत डाऊनलोड करा PDF स्वरूपात!
नवरात्रोत्सव 2020 च्या शुभेच्छा
नवरात्र विशेष व्हॉट्सअॅप स्टेट्स
नवरात्रीच्या शुभेच्छा आता खास व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या मदतीने शेअर करण्याची देखील सोय आहे. याकरिता प्ले स्टोअर मध्ये 'Navratri', 'Happy Navratri 2020', 'Navratri Stickers', 'Navratri Photo Frames', असं सर्च करा.तुम्हांला अनेक कलरफूल व्हॉट्सअॅप स्टिकर्स मिळू शकतात.
गुजरातींसाठी जसा दांडिया, रास गरबा खेळला जातो तसा महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने नवरात्र साजरा करणारी मंडळी 'भोंडला' या खेळाचा देखील आनंद लुटतात. परंतू यंदा शारदीय नवरात्रीचा आनंद घरामध्ये राहूनच घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मग यंदा तुम्ही सुरक्षितपणे साजरी करताय? हे आम्हांला नक्की कळवा. शुभ नवरात्र!