Happy Pongal 2020 Wishes: पोंगल सणाच्या शुभेच्छा Messages, Greetings, HD Images, Wallpaper, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून तमिळ बांधवांना द्या शुभेच्छा!
या निमित्ताने तुमच्या ओळखीतील सर्व मित्र मैत्रिणींना व कुटुंबियांना या खास Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या पोंगलच्या शुभेच्छा.
Happy Pongal 2020 Wishes: पोंगल हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. चार दिवस चालणाऱ्या या सण ऊस, तांदूळ आणि हळद या पिकांच्या काढणीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यास जेव्हा उत्तर भारतात लोहरी आणि पश्चिम भारतात मकर संक्रांत साजरी केली जाते त्याच वेळी पोंगल हा सण देखील साजरा होता. मुळात, पोंगलच्या सणाला शेतकरी निसर्गाचे, सूर्यदेवतेचे आणि शेतातील प्राण्यांचे वर्षाचे उत्पादन वाढविण्यास मदत केल्याबद्दल आभार मानतात तर इतर लोक पिकांचे उत्पादन घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानतात.
तामिळ भाषेत ‘पोंगल’ या शब्दाचा अर्थ “उकळणे” असा होतो. उकडलेले तांदूळ, मूग डाळ, दूध आणि गूळ या पासून बनवल्या जाणाऱ्या एका गोड पदार्थाचे देखील हे नाव आहे, जे या सणादरम्यान खास तयार केले जाते.
या वर्षी पोंगल हा सण 15 जानेवारीपासून सुरु होणार असून 18 जानेवारीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने तुमच्या ओळखीतील सर्व मित्र मैत्रिणींना व कुटुंबियांना या खास Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या पोंगलच्या शुभेच्छा.
पोंगलच्या शुभेच्छा
पोंगल सणाच्या शुभेच्छा
यंदाचा पोंगल सण तुम्हांला सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो!
Let Us Meet, Greet and Eat Together With This Auspicious Decoration and Beautiful Kolams. Wish You a Very Happy Pongal.
पोंगल उत्सव चार दिवस साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाचे विशिष्ट महत्त्व असते. पोंगलच्या पहिल्या दिवसाला भोगीचा सण म्हणतात. या दिवशी भगवान इंद्र देवाची पूजा केली जाते.पोंगलचा दुसरा दिवस थाई पोंगल म्हणून ओळखला जातो, ज्या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. पोंगलच्या तिसर्या दिवसाला मट्टू पोंगल म्हणून ओळखले जाते, त्यामध्ये गायीला हार आणि घंटा यांनी सुशोभित केले जाते आणि त्यांची पूजा करण्यात येते. पोंगलचा चौथा आणि शेवटचा दिवस म्हणजे कानूम (किंवा कानू) पोंगल.