Happy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल!
Parent's Day Messages in Marathi: पालक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन तुम्ही आपल्या आई-बाबांचा दिवस स्पेशल करु शकता.
राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छा!
निस्वार्थ प्रेम आणि त्याग
याचे एकतर्फी वचन पाळून
मुलांचे सुयोग्य संगोपन करणार्या
सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छा!
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही...
आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही..
जगातील सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मनातलं जाणणारी आई
भविष्य ओळखणारा बाप
अजून काय हवं जीवनात
राष्ट्रीय पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जी प्रेम करते तिला आई म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात
राष्ट्रीय पालक दिनाच्या शुभेच्छा!
मातृ देवो भव...
पितृ देवो भव
राष्ट्रीय पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आईची थोरवी साहित्यातून वर्णली गेली आहे. तर बाबांची माया दर्शवणारी गाणी, कविता आहेत. खरंतर पालकांशिवाय जगणं समृद्ध होऊ शकत नाही. प्रेम, माया, आपुलकी, संस्कार, शिकवण, मार्गदर्शन सगळं करण्यात पालक महत्त्वाची भूमिका बजावतात. पालकांमुळेच सुरक्षेचं छत आपल्यावर निर्माण होतं. त्यामुळे या पालक दिनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी अजिबात दवडू नका.