Happy New Year 2024 Quotes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठमोळे Quotes, WhatsApp Status शेअर करत म्हणा नूतन वर्षाभिनंदन!
1 जानेवारीपासून सुरू होणार्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स कार्ड्स, शुभेच्छापत्रं नकी शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत!
2023 ला अलविदा म्हणत आता आपला प्रवास नव्या वर्षाच्या दिशेने सुरू झाला आहे. या नव्या वर्षामध्ये आता नव्या संकल्पाच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईलांना, आप्तेष्टांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील द्यायला विसरू नका. WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, HD Images द्वारा तुम्ही मराठमोळ्या अंदाजामध्ये सोशल मीडीयात सार्यांना नूतन वर्षाभिनंदन (Happy New Year) म्हणू शकता.
ग्रेगेरियन कॅलेंडरची सुरूवात 1 जानेवारी पासून होते. यंदा 1 जानेवारीला सोमवार असल्याने आठवड्याची सुरूवात देखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. जगभरात रात्री 12 वाजता जागून सरत्या वर्षाला टाटा-बाय बाय करत नव्या वर्षाची सुरूवात मोठ्या आशेने केली जाते. मग वर्षाचा हा दिवस सकारात्मक जावा म्हणून तुम्ही काही सकारात्मक विचार देखील नववर्षाच्या पहिल्या दिवशी पाठवू शकता. नक्की वाचा: Happy New Year 2024 in Advance Wishes: नववर्षाच्या शुभेच्छा अॅडव्हान्समध्ये देणारी मराठमोळी Greetings, Messages, Photos!
नववर्षाच्या शुभेच्छा संदेश!
उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नूतन वर्षाभिनंदन
2024, नव्या सालाच्या मनापासून शुभेच्छा!
चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नव्या आशा-अपेक्षांसह
आलं 2024 हे साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात. त्याचे नाव पोप ग्रेगरी यांच्या नावावरून ठेवण्यात आले. 15 ऑक्टोबर 1582 पासून लागू झालेले हे कॅलेंडर आता जगभर प्रसिद्ध आहे. याच आधारावर आता 1 जानेवारीला नववर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे. भारतामध्ये विविध धर्मांनुसार, प्रांताच्या रचनेनुसार नववर्ष सुरू होण्याची तारीख, महिना आणि कॅलेंडर हे वेगवेगळे आहे पण जागतिक स्तरावर समानता राखण्यासाठी ग्रेगेरियन कॅलेंडरच्या नववर्षाची सुरूवात 1 जानेवारीला होते.