Happy Labour Day 2023 Wishes: आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त Messages, HD Images, SMS, Greetings, Quotes द्वारे तुमच्या सहकाऱ्यांना द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!

यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

Happy Labour Day 2023 Wishes: जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस (Labour Day 2023) मोठ्या उत्सवात आणि सन्मानाने साजरा केला जातो. जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2022 हा 1 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाची तारीख 1889 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशालिस्ट ग्रुप्स आणि ट्रेड युनियन्सने कामगार हक्क चळवळीच्या समर्थनार्थ निवडली होती. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशालिस्ट ग्रुप्स आणि ट्रेड युनियन्स द्वारे 1889 मध्ये शिकागो येथे 1886 च्या हेमार्केट दंगलीत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची स्थापना करण्यात आली. पाच वर्षांनंतर, यूएसमध्ये, अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी काही राज्यांना 1 मे रोजी कामगार दिन साजरा करण्याची परवानगी देणार्‍या कायद्यावर स्वाक्षरी केली.

दरम्यान, 1889 मध्ये पॅरिसमध्ये कामगार आणि कामगारांच्या समर्थनार्थ आणि शिकागोच्या हेमार्केट दंगलीत प्राण गमावलेल्या कामगारांची मूल्ये आणि हक्क लक्षात ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा अधिकृत दिवस म्हणून ओळखला गेला. आंतरराष्ट्रीय कामगार दिन मजुरांच्या समर्थनार्थ रॅली आयोजित करून आणि त्यात सहभागी होऊन साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त Messages, HD Images, SMS, Greetings, Quotes द्वारे तुम्ही देखील तुमच्या सहकाऱ्यांना कामगार दिवसाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -May Day 2023: आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त WhatsApp Messages, HD Photos, Wishes द्वारे शेअर करा कामगार दिनाचे खास वॉलपेपर)

जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,

रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,

तो प्रत्येक जण ‘मजदूर’ असतो…

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार,

उभारतोस स्वप्नांचे मीनार,

कामगारा! तुझ्या कष्टाला सलाम

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा

किंवा बरसोत असो

पावसाच्या ओल्याचिंब धारा

तरी राबतो आपला कामगार अन सर्जा राजा

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे

आणि ज्यांच्या समर्पणामुळे

देश घडविण्यात मदत झाली

अशा सर्व कामगार बंधू आणि बघिनिंना

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

सर्व कष्टकरी आणि

श्रमिक बांधवांना

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

देशाच्या जडणघडणीत मोलाचे

योगदान देणाऱ्या माझ्या सर्व

श्रमिक बांधवांना…

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Labour Day 2023 Wishes (PC - File Image)

जगभरात दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मे महिन्याचा एक दिवस त्यांना समर्पित केला जातो. कामगार दिन हा केवळ कामगारांचा सन्मान करण्याचा दिवस नाही तर या दिवशी कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला जातो. जेणेकरून त्यांना समान अधिकार मिळू शकतील.