Happy Janmashtami 2026 Wishes: जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, WhatsApp Status द्वारा देत साजरा करा श्रीकृष्ण जन्मोत्सव
श्रीकृष्ण जयंतीचा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा करताना आज तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नक्की WhatsApp Status, Wishes, HD Images, Wallpapers शेअर करायला विसरू नका.
Happy Krishna Janmashtami Wishes in Marathi: श्रावण वद्य अष्टमीचा दिवस हा श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा (Shri Krishna Janmotsav) दिवस आहे. पुराणातील अख्यायिकेनुसार श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा आठवा अवतार असेदेखील समजले जाते. भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता, अशी मान्यता आहे. दरवर्षी जन्माष्टमीच्या रात्री बाळकृष्णाचा जन्मदिन साजरा केला जातो.या दिवसाचं औचित्य साधून कृष्ण भक्त मंदिरांसह अनेकजण घराघरामध्येही कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. मग अशा या मंगल पर्वाच्या शुभेच्छा WhatsApp Status, HD Images, Wishes, Greetings, SMS द्वारा मेसेजेसच्या माध्यमातून शेअर करून जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचा सण यंदा साजरा करा.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधत खास पाळणा सजवला जातो. मध्यरात्री पाळणा गाऊन घराघरामध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत आहे. नैवेद्यामध्येही दूध, लोणी, तूपापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. नक्की वाचा: Dahi Handi 2026 Date: 5 सप्टेंबरला मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात जल्लोषात साजरा होणार गोपाळकाल्याचा उत्सव!
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

लोणी-साखरेचा गोडवा, कृष्णाच्या ओठांवर,
तसाच गोडवा राहो सदा, तुमच्या नात्यांवर.
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

राधेच्या मनातला कान्हा, कधी दूर कधी जवळ,
तसंच प्रेम राहो तुझ्या, आयुष्यात, कायमचं आणि निखळ.
शुभ जन्माष्टमी!

यमुनेच्या लाटांवर, कृष्णलीला बहरली,
भक्तीच्या या पर्वात, मने सारी हरखली.
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

यशोदेचा लाडका कृष्ण झाला
जरी जन्म पोटी देवकीच्या झाला
चला तर मग आज आनंदाने
साजरा करूया गोपाळकाला
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
मथुरा ही भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी मानली जाते, त्यामुळे येथे हा सण अत्यंत विशेष पद्धतीने साजरा केला जातो.श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरात 4 सप्टेंबरच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य जन्मोत्सव कार्यक्रम होणार आहे. यावेळी भगवंताच्या जन्माची झांकी, अभिषेक, आरती आणि इतर धार्मिक विधी पार पडतात.
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2026 08:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

