Happy Independence Day 2021 Messages: खास Quotes, Wishes, Images, WhatsApp Status शेअर करून साजरा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन
75th Independence Day Message in Marathi: 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्यदिन! (Independence Day 2021) प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस एखाद्या सणासारखा आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नवीन सुरवातीची आठवण करून देते. याच दिवशी 1947 साली 200 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश वसाहतवादाच्या तावडीतून मुक्त होऊन एका नवीन युगाची सुरुवात झाली होती
75th Independence Day Message in Marathi: 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्यदिन! (Independence Day 2021) प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस एखाद्या सणासारखा आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नवीन सुरवातीची आठवण करून देते. याच दिवशी 1947 साली 200 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश वसाहतवादाच्या तावडीतून मुक्त होऊन एका नवीन युगाची सुरुवात झाली होती. 15 ऑगस्ट 1947 हा भाग्यवान दिवस होता जेव्हा भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र घोषित करण्यात आले आणि देशाच्या नियंत्रणाची सूत्रे देशातील नेत्यांना देण्यात आली.
भारताचा स्वातंत्र्य संग्राम बराच काळ चालला होता. या दरम्यान अनेक लोकांनी, नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत जो आपण स्वतंत्र भारत्ताचा अनुभव घेत आहोत. तर असा हा खास स्वातंत्र्य दिन व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही Messages, Quotes, Wishes HD Images, Wallpapers शेअर करून साजरा करा.
ज्यांनी भारतदेश घडविला
75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रूप, रंग , वेश, भाषा जरी आहेत अनेक
तरी आम्ही सारे भारतीय आहोत एक
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला. त्यानंतर ब्रिटिश भारताचे धार्मिक आधारावर विभाजन झाले व भारत आणि पाकिस्तान उदयास आले. फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये हिंसक दंगली उसळल्या आणि जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. मानवजातीच्या इतिहासात कधीही फाळणीमुळे इतक्या मोठ्या संख्येने लोकांचे विस्थापन झाले नाही. ही संख्या सुमारे 1.45 कोटी होती. भारताच्या 1951 च्या जनगणनेनुसार 72,26,000 मुसलमानांनी भारत सोडला आणि फाळणीनंतर लगेच पाकिस्तानात गेले आणि 72,49,000 हिंदू आणि शीख पाकिस्तान सोडून भारतात आले.
दरम्यान, यंदाचा स्वातंत्र्यदिन खास आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारत यंदा आपला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करणारअ आहे. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. मात्र संपूर्ण जगाच्या नाकावर टिच्चून आजही भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश ओळखला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)