Happy Halloween 2020 Images: हॅलोवीनच्या शुभेच्छा Quotes, Messages, GIFs द्वारा शेअर करत खास करा तुमच्या मित्र मंडळींची 31 ऑक्टोबरची रात्र

आजच्या हॅलोवीन रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी काही मेसेजेस,Wishes, Quotes, GIFs च्या मदतीने तुम्ही सोशल मीडीयात थोडे प्रॅन्क्स करून यंदा व्हर्च्युअल हॅलोवीनचं सेलिब्रेशन नक्कीच करू शकाल!

Halloween Cards (Photo Credits: File Image)

आज 31 ऑक्टोबर, हॅलोवीनची ( Halloween ) रात्र! दरम्यान यंदा जगभरात अजूनही कोरोनाचं सावट घोंघावत असताना पारंपारिक पद्धतीने पाश्चात्य देशात आणि अगदी भारतामध्येही आज हॅलोवीन साजरा करता येणार नाही. पण अनेकांनी आजच्या विकेंडची मज्जा द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरीच भोपळ्याचं कार्व्हिंग केले असेल किंवा ऑनलाईन हॅलोवीन पार्ट्यांचं आयोजन केलं असेल. पण तुम्ही पारंपारिक पद्धतीने चित्र-विचित्र वेषभूषा करून तुमच्या जवळच्या व्यक्तींना, प्रियजनांना हॅलोवीनच्या शुभेच्छा देऊ शकत नसलात तरीही सोशल मीडीयामुळे जवळ आलेल्या जगात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून Happy Halloween, Halloween Night 2020, Spooky Halloween Greetings शेअर करत 31 ऑक्टोबरची रात्र थोडी स्पेशल नक्कीच करू शकता. आजच्या हॅलोवीन रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी काही मेसेजेस,Wishes, Quotes, GIFs च्या मदतीने तुम्ही सोशल मीडीयात थोडे प्रॅन्क्स करून यंदा व्हर्च्युअल हॅलोवीनचं सेलिब्रेशन नक्कीच करू शकाल! Happy Halloween: हॅलोविन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या सेलिब्रेशन बाबत '7' इंटरेस्टिंग गोष्टी

हॅलोवीन चा मूळ शब्द Hallows’ Eve असा आहे. त्याचा अर्थ संत लोकांच्या स्मराणाची रात्र असा आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये 1 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 ऑक्टोबरला त्याचं सेलिब्रेशन होतं. 1 नोव्हेंबरला चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. तर 2 नोव्हेंबर पर्यंत त्याचं सेलिब्रेशन सुरू असतं. दरम्यान हॅलोवीन म्हणजे समर सीझन (उन्हाळा) संपून थंडीची चाहूल देणारा दिवस. अनेकांच्या मते या दिवशी मृत प्रेतात्मा पृथ्वीवर लोकांना भेटायला येतात.

हॅप्पी हॅलोवीन

Halloween Cards (Photo Credits: File Image)

via GIPHY

Halloween Cards (Photo Credits: File Image)

via GIPHY

Halloween Cards (Photo Credits: File Image)

हॅलोवीनच्या रात्री लहान मुलं भूत-खेतांचे विचित्र कपडे परिधान करून रात्री ‘ट्रिक ऑर ट्रीट’ म्हणत घरोघरी फिरतात. तर दृष्ट मृतात्मांना लांब ठेवण्यासाठी घराघरामध्ये भोपळ्यात कार्व्हिंग करून त्यामध्ये लाईट्स लावले जातात. यामुळे भूत लांब राहतात असा विश्वास आहे. या भोपळ्यांच्या दिव्यांना जॅको लॅटर्न असे म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही यंदा हॅलोविनचं सेलिब्रेशन करताय का? ते आम्हांला नक्की सांगा. तुम्हांला लेटेस्टली कडून Happy Halloween Night 2020!



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif