Happy Friendship Day Greetings: फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा देत साजरा करा मैत्री दिन!
फ्रेंडशीप डे हा यंदा 2 ऑगस्टला साजरा केला जात आहे. या निमित्ताने तुमच्या मित्रपरिवाराला खास मराठमोळ्या शुभेच्छापत्रांमधून, मेसेजेस मधून मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे संदेश नक्की पाठवा.
Happy Friendship Day 2026: ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार म्हणजेच फ्रेंडशिप डे (Friendship Day). हा दिवस मैत्रीच्या नात्यासाठी खास राखीव असतो. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर साथ देणारे, समजून घेणारे आणि निःस्वार्थपणे प्रेम करणारे मित्र मिळणं हीच खरी संपत्ती असते. या खास दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींचे आभार मानून त्यांच्यासोबतचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी खास वेळ एकत्र घालवला जातो. एककमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. मैत्री हे असं नातं आहे जे रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं असूनही तितकंच घट्ट आणि विश्वासाचं असतं. आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणी साथ देणारा, न बोलताही मन समजून घेणारा आणि कोणत्याही परिस्थितीत पाठीशी उभा राहणारा मित्र मिळणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट असते. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातील अशा सर्व मैत्रीच्या नात्यांना सेलिब्रेट करण्यासाठी खास मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारी ग्रिटिंग़्स, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Quotes शेअर करत हा दिवस सेलिब्रेट करा. नक्की वाचा: Happy Friendship Day Wishes For Wife: पत्नीसोबत मैत्रीचं नातं सेलिब्रेट करण्यासाठी खास WhatsApp Status, Messages, Greetings.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारी ग्रिटिंग़्स, शुभेच्छापत्रं





फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली असून, आज हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातही दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मित्रमैत्रिणी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधतात, भेटवस्तू देतात आणि आपल्या नात्यातील खास क्षण साजरे करतात.
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2026 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

