Happy Friendship Day 2022 Messages: 'मैत्री दिना'निमित्त खास Wishes, Quotes, Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन वृद्धींगत करा मैत्रीच्या नात्यातील बंध
प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. मैत्रीचे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत.
आयुष्यामध्ये अनेक नाती येतात, काही नाती जन्मताच मिळतात, तर काही जोडली जातात. या सर्वांमध्ये लिंग, जात, धर्म, आर्थिक स्थिती, वय अशा सर्वांच्या पलीकडचे एक नाते असते, त्याला आपण मैत्री (Friendship) म्हणतो. आपल्या जवळची, आपल्याला समजून घेणारी, दुःखात तसेच आनंदात आपल्या सोबत राहणारी व्यक्ती म्हणजे मित्र. मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी काही खास दिवसाची गरज नाही, परंतु तरी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day 2022) साजरा केला जातो. यावर्षी 07 ऑगस्ट (रविवार) रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे.
1935 मध्ये पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. त्यावेळी अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात हा दिवस साजरा करण्यात आला होता. मैत्रीचे प्रतीक म्हणून ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जाऊ लागला, त्यानंतर त्याला जगभरात एक उत्सवाचे स्वरूप आले.
भारतासह बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करतात. मात्र पेरुग्वेमध्ये 20 जुलै 1958 रोजी डॉ. रामोन आरटिमो ब्राचो यांनी अधिकृतरीत्या जागतिक मैत्री दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली होता. आजच्या या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही खास HD Images, Wallpapers, Messages, Wishes, Quotes च्या माध्यमातून तुमच्या मित्रांना शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. मैत्रीचे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. कधी कधी तुमचे रक्ताची नाती तुटू शकतात, मात्र प्रेम, आपुलकी, विश्वास, आदर असलेले मैत्रीचे नाते आपल्याला आयुष्यभर सोबत करते.