Happy Father's Day 2023 Wishes In Marathi: फादर्स डे च्या शुभेच्छा Facebook Messages, Quotes, WhatsApp Status द्वारा शेअर करत खास करा आज बाबांचा दिवस
फादर्स डे निमित्त खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, फोटोज, मेसेजेस शेअर करून या दिवसाचा तुमच्या बाबांच्या आयुष्यातील दिवस खास करायला विसरू नका.
जून महिन्याच्या तिसर्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा हा फादर्स डे 18 जून दिवशी साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हक्काची दोन माणसं असतात ज्यांच्या ऋणातून उतराई होणं शक्य नाही म्हणजे आपले आई- बाबा! बाबा हा त्यामध्येही असा एक व्यक्ती आहे ज्याच्या मेहनतीला आईच्या तुलनेत थोडं कमीच समजून घेतलं जातं. त्यामुळे यंदा तुमच्या वडिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेलं तुमचं प्रेम व्यक्त करायला विसरू नका. सोशल मीडीयातही तुमच्या वडिलांसाठी खास शुभेच्छा, मेसेजेस, WhatsApp Status, Wishes शेअर करून तुमच्या नात्यातील ओलावा कायम ठेवू शकता.
बाप-लेकीचं नातं हे थोडं स्पेशल असतं. मुलीसाठी बाप हा तिचं पहिलं प्रेम, सुपरहिरो असतो. मग त्याच्यासाठी या रविवारी खास सेलिब्रेशन करायला विसरू नका. Father's Day 2023 Songs: खास फादर्स डे निमित्त वडिलांप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी बाॅलिवूडमधील गाणी .
फादर्स डे शुभेच्छा ( Fathers Day Wishes in Marathi)
माझे वडील माझे पहिले प्रेम आहे,
या छोट्याशा जगात माझे अनंत जग आहे.
हॅप्पी फादर्स डे!
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे
फादर्स डे च्या शुभेच्छा
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
फादर्स डे च्या शुभेच्छा
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’
अशा या 'बाप'माणसाला फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
हॅप्पी फादर्स डे!
19 जून 1910 हा पहिला फादर्स डे साजरा झाला आहे. Sonora Dodd यांनी फादर्स डे चं सेलिब्रेशन सुरू केले होते. Sonora Dodd चे वडील William Jackson Smart हे सिंगल पेरंट होते. त्यांनी सहा मुलांना वाढवलं. Sonora Dodd यांनी मदर्स डे सेलिब्रेशन बद्दल ऐकलं मग तशाच प्रकारे फादर्स डे सेलिब्रेट करण्याची कल्पना त्यांना प्रत्यक्षात आणली. जगभरात वेगवेगळ्या दिवशी फादर्स डे सेलिब्रेट करण्याची पद्धत आहे. मार्च, एप्रिल, जून महिन्यात फादर्स डे साजरा करतात.