![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/06/fathers-day-riddhi-784x441-380x214.jpg)
Father's Day Wishes in Marathi: फादर्स डे (Father's Day 2020) म्हणजेच थेट आपल्या मराठीत सांगायचं तर, पितृदिन. हा दिन साजरा होतोय येत्या 16 जून रोजी. काही लोक या दिवसाकडे मदर्स डे म्हणजेच मातृदिनाला पूरक म्हणूनही पाहतात. अपवाद वगळता जगातील प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या स्वत:च्या म्हणून यशाच्या मागे खंबीर सूत्रधार म्हणजे प्रत्येकाचे बाबा. पण, आयत्या वेळी होणारा उद्धार वगळता बाबा हा यशाचा पाठीराखा असूनही अनेकदा पडद्यामागचा सूत्रधाराच ठरतो.
खरं तर असे कुठल्या विशिष्ट दिवशी शुभेच्छा दिल्याने कोणाच्याच वडिलांप्रती प्रेमाची भावना पूर्ण होऊ शकत नाही. परंतू, तरीही केवळ एक सोशल मीडियावरची टूम म्हणून हा दिवस साजरा केला जातो. खरे तर वडिलांना शुभेच्छा देण्याची काय गरज. प्रेमच इतकं भरभरुन केलं पाहिजे की शुभेच्छा द्यायचीच वेळ येता कामा नये. तर पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं देत साजरा करा आजचा फादर्स डे!(Father's Day 2020 Funny Memes and Jokes: फादर्स डे च्या निमित्त सोशल मीडिया वर हे फनी मीम्स व्हायरल; पहा आणि सांगा तुमचे वडील पण असेच आहेत का?)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/fathers-day-13-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/fathers-day-12.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/fathers-Day-11.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/fathers-dday-17.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/fathers-day-18.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/fathers-day-16.jpg)
दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांच्या हालचालिंवरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे वडिलांसाठी विशेष काही गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाताना काळजी घ्या. अधिक तर घरी थांबून वडिलांसोबतच फादर्स डे साजरा करणे उत्तम.