Father's Day 2020 Wishes: पितृदिन निमित्त मराठी शुभेच्छा, Quotes, Images, Messages, Greetings शेअर करून द्या फादर्स डे च्या शुभेच्छा

'फादर्ड डे' साठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे यंदाच्या 'फादर्स डे' निमित्त त्यांना एखादे सरप्राइज देण्यासोबत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी आतापासूनच प्रत्येकाने सुरुवात केली आहे.

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

Father's Day 2020 Wishes in Marathi: दिवसाची रात्र करुन आपल्या कुटूंबासाठी, आपल्या मुलांसाठी अहोरात्र कष्ट करणा-या घरातील कर्त्यापुरुषाला बाबा,पप्प, डॅडी, पापा, पॉप काहीही म्हणा, पण त्याने त्याची महती काही कमी होणार नाही. अशा घराचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या बाबांचा विशेष सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 'जागतिक पितृदिन'. यंदाच्या 'फादर्स डे' निमित्त त्यांना एखादे सरप्राइज देण्यासोबत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहेत. फादर्स डे निमित्त आपल्या बाबांनी आपल्यासाठी केलेले कष्ट, आपल्यावरील प्रेम आणि त्यांची आपल्यासाठी झटपट या सारख्या अनेक गोष्टींसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. येत्या 21 जून रोजी फादर्ड डे साजरा करण्यात येणार आहे.(Father's Day 2020 Quotes: आपल्या जीवनात वडिलांचे महत्त्व सांगणारे 10 विचार)

फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली. तर फादर्स डे निमित्त WhatsApp Stickers, Quotes, Images, Messages, Wallpapers आणि Greetings शेअर करून बाबांना द्या शुभेच्छा!(Father's Day 2020 Gift Ideas: फादर्स डे दिवशी बाबांना खूष करण्यासाठी बनवू शकता या घरच्या घरी भेटवस्तू!)

-आपल्याला हसवणारे आणि खेळवणारे

आईने कधी मारले तर तिच्यावर रागावणारे

आपली मुले खुप मोठी व्हावीत म्हणून झटणारे

आपल्या लेकरांसाठी उंच अपेक्षा बाळगणाऱ्या बाबांसाठी

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

-आपले दु:ख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे 'वडील'

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

-कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी 'पिता'

शांत, प्रेमळ, कठोर, रागीट, बहुरुपी असा 'पिता'

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

-आकाशालाही लाजवेल अशी उंची आणि आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे 'बाबा'

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

-कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला म्हणाले नाही

माझ्या वडिलांसारख्या मनाने श्रीमंत मी दुसरं कोणाला पाहिलं नाही

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

21 जून जवळ आला आहे असल्याने आमच्याकडून आपणास सर्वांना फादर्स डे 2020 च्या हार्दिक शुभेच्छा. आपण या खास दिवशी आपल्या लाडक्या वडिलांना आनंदित करण्यासाठी नक्कीच पूर्ण मानाने प्रत्यत्न कराल हे आम्हाला माहित आहे. आम्ही आशा करतो की फादर्स डे 2020 आपणास आणि आपल्या वडिलांसाठी चांगला जावो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif