IPL Auction 2025 Live

Happy Father's Day 2020 Messages: फादर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greeting, Whatsapp Status, Facebook Images लाडक्या बाबांना पाठवुन करा पितृदिन साजरा

या दिवशी अस्सल मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greeting तुमच्या Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

Happy Father's Day 2020 Marathi Messages: आपल्या अस्तित्वाचं कारण,  'तू पुढे हो मी पाठीशी आहे' या वाक्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबा नावाचा आपल्या आयुष्यातील बापमाणूस! येत्या रविवारी म्हणजेच 21 जून रोजी फादर्स डे (Father's Day) आहे.आपल्याला जन्म देण्यापासून ते ओळख देण्यापर्यंत आणि ती ओळख कशी जपावी याचे धडे देणाऱ्या वडिलांना थँक्यू म्हणण्याचा हा दिवस आहे. यंदा या दिवसाच्या निमित्ताने आपणही आपल्या वडिलांना फार काही नाही तर निदान शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस खास करू शकता.साधारणतः अनेकांच्या मनात वडिलांविषयी आदरयुक्त भीती असते, अशावेळी ऑनलाईन शुभेच्छापत्र तुमच्या नक्की कामी येतील. यासाठीच खाली दिलेले अस्सल मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greeting तुमच्या Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून नक्की शेअर करा. (Father's Day 2020 Quotes: आपल्या जीवनात वडिलांचे महत्त्व सांगणारे 10 विचार)

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अनेक देशात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. फादर्स डे सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. सोनेरा डोड यांनी आपला सांभाळ करणाऱ्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती, पुढे भारतातही हा दिवस स्वीकारून साजरा केला जाऊ लागला. यंदा या सणाच्या निमित्ताने तुमच्या वडिलांसोबत वेळ घालवून, गप्पा मारून, त्यांना एखादी आवडती डिश खाऊ घालून तुम्ही हे सेलिब्रेशन करू शकता. Father's Day 2020 Gift Ideas: फादर्स डे दिवशी बाबांना खूष करण्यासाठी बनवू शकता या घरच्या घरी भेटवस्तू!

फादर्स डे मराठी शुभेच्छा

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

दरम्यान, जन्म देणाऱ्या प्रत्येक आईप्रमाणे सांभाळ करणाऱ्या, वडिलांनाही सन्मान देण्याचा आणि ते आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे.