Happy Eid Mubarak 2019: जगभरातील 'या' 5 प्रसिद्ध 'मस्जिद' बद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी
तर या सणावेळी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या जल्लोषात त्याचा आनंद साजरा करताना दिसून येतात. तसेच ईदच्या दिवशी नवीन वस्र परिधान करुन लोक मस्जिदमध्ये जाऊन अल्लाहकडे प्रार्थना करतात.
Happy Eid Mubarak 2019: मुस्लिम समाजातील महत्वाचा सण म्हणजे ईद हा सप्तमीच्या टप्प्यात आहे. तर या सणावेळी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या जल्लोषात त्याचा आनंद साजरा करताना दिसून येतात. तसेच ईदच्या दिवशी नवीन वस्र परिधान करुन लोक मस्जिदमध्ये जाऊन अल्लाहकडे प्रार्थना करतात. नमाज पढल्यावर मुस्लिम बांधव एकमेकांना ईदीच्या शुभेच्छा देतात.
इस्लामिक दिनदर्शिकेनुसार, नववा महिना हा रमजानचा असतो. या महिन्यात रोजे केले जातात. या काळात सुर्योदयापूर्वी आणि सुर्यास्तनंतर पाणी, अन्न ग्रहण केले जाते. सकाळी सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते त्यास 'सहेरी' तर सुर्यास्तानंतर केल्या जाणाऱ्या अन्न ग्रहणास 'इफ्तार' असे म्हणतात.याच ईदच्या सणानिमित्त जगभरातील 'या' 5 प्रसिद्ध मस्जिद बद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
1) नूर अस्थाना मस्जिद (कजाकिस्तान):
कजाकिस्तानमधील नूर अस्थाना मस्जिदीची उभारणी 2008 सालात करण्यात आली होती. नूर अस्थाना मस्जिद बनवण्यासाठी काचेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याने त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मस्जिदचा रंग सोनेरी असून सेंट्रल ऐशियामधील सर्वात मोठे मस्जिद असल्याचे म्हटले आहे.
2) शेख जैयद ग्रँन्ड मस्जिद (आबु धाबी):
शेख जैयद ग्रँन्ड मस्जिद हे आबु धाबी मधील सर्वात मोठे मस्जिम असल्याचे म्हटले जाते. मस्जिदचा घुमट याचे आकर्षण आहे. यामध्ये एकूण 82 घुमट आहेत. शेख जैयद ग्रँन्ड मस्जिद बनवण्यासाठी 600 मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले. 2007 रोजी बांधकाम पूर्ण करण्यासाठी 11 वर्षांचा कालावधी लागला होता.
3) सुल्तान अहमद मस्जिद (इस्तानबुल):
इस्तानबुल मध्ये असलेल्या या मस्जिला ब्लू मस्जिद असे म्हटले जाते. या मस्जिदचा इतिहास खुप जुना आहे. मस्जिदला ऑटोमन अॅम्पाअर खिलाफत उस्मानिया याच्या काळात 1609 मध्ये बनवण्यात आले. मस्जिदचे घुमट हे निळ्या रंगाच्या टाईल्सने उभारण्यात आले असल्याने त्याला ब्लू मस्जिद असे म्हटले जाते.
4)बादशाही मस्जिद (लाहौर):
लाहौर येथील बादशाही मस्जिद पाकिस्तानमध्ये आहे. 1673 रोजी मुघल सम्राट औरंगजेबाने या मस्जिदची उभारणी केली होती. त्यामुळे मुघल काळातील सौंदर्य आणि भव्यतेचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तान मधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठे मस्जिद म्हणून बादशाही मस्जिद ओळखले जाते. या मस्जिदमध्ये एकावेळेस 55 हजार लोक नमाज पठण करु शकतात.
5) मस्जिद-ए-नबवी (सौदी अरेबिया)
मस्जिद-ए-नबवी हे मस्जिद सौदी अरेबियामधील मदीना शहरात वसलेले आहे. हे मस्जिद जगभरातील सर्वात सुंदर मस्जिद असल्याचे म्हटले जाते. यामध्ये एकावेळेस 10 लाख लोक नमाज पठण करु शकतात.
रमजान ईद अथवा ईद-उल-फितर फितर मुस्लिम समुदायाचा सर्वात मोठा सण असतो. या काळात पहाटे नमाज अदा केली जाते. या काळात सर्वाधिक लोक हे ईदगाह मध्ये जाऊन नमाज अदा करणे पसंत करतात. या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी, नातेवाईकांचे एकमेकांना भेटणे, मित्र-परिवारासोबत आनंदाची देवाणघेवाण होते. लहान थोर आणि महिला मोठ्या आनंदात असतात.