Happy Durga Ashtami 2021: दुर्गाष्टमी निमित्त WhatsApp Status, Fcebook Messages शेअर करत देवींच्या भक्तांचा मंगलमय करा आजचा दिवस
नवरात्रीतील या पावनपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शुभेच्छा देऊन देखील आजच्या दिवसाची मंगलमय सुरूवात करू शकता.
शारदीय नवरात्री मधील अश्विन शुद्ध अष्टमी चा दिवस हा दुर्गाष्टमी ( Durga Ashtami) म्हणून ओळखला जातो. या दिवसाला महा अष्टमी (Maha Ashtami) म्हणून देखील संबोधलं जातं. यंदा नवरात्री मधील दुर्गाष्टमी/महाअष्टमी 13 ऑक्टोबर दिवशी आहे. मग नवरात्रीतील या पावनपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शुभेच्छा देऊन देखील आजच्या दिवसाची मंगलमय सुरूवात करू शकता. प्रामुख्याने कोलकाता मध्ये अष्टमीला दुर्गा पूजेचं विशेष महत्त्व आहे. Navratri Kanya Pujan 2021: कन्या पूजन कसे कराल, जाणून घ्या योग्य पद्धतीसह विधी.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यापैकी अष्टमीला महागौरी पुजली जाते. या दिवशी कुमारिकांना, बालिकांना स्वयं दुर्गा देवीचं रूप मानून महाष्टमीला तिचं पूजन करण्याची देखील प्रथा आहे. नवरात्रीत घट उठाता -बसता उपवास करणारी मंडळी देखील या दिवशी उपवास ठेवतात. होम हवन करतात. घरीच 5,7 मुलींना बोलावून त्यांचं पूजन करतात.
महाष्टमीच्या शुभेच्छा
आशा है कि दुर्गा अष्टमी से,
रोशन हो जाए आपका घर-संसार,
माता के आशीर्वाद से खिल उठे मन,
और बढ़ता जाए आपका धन...
दुर्गाष्टमी की शुभकामनाएं
यंदा एका तिथीच्या क्षयामुळे केवळ 8 रात्रींची नवरात्र आहे. 15 ऑक्टोबर दिवशी दसरा अर्थात विजयादशमी आहे. दसरा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवशी सोन्याची लूट केली जाते.