Happy Doctor's Day 2021 Quotes: 'राष्ट्रीय डॉक्टर दिना'निमित्त खास मराठी Messages, Wishes, HD Images शेअर करून करा डॉक्टरांच्या योगदानाचा सन्मान
स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी त्यांनी नि:स्वार्थपणे जखमी आणि पीडितांची सेवा केली होती. डॉक्टर दिन साजरा करण्यामागील हेतू म्हणजे समाजातील डॉक्टरांबद्दल सहानुभूती व्यक्त करून त्यांचा सन्मान करणे हा आहे.
डॉक्टरांना ‘पृथ्वीवरील देव’ मानले जाते. देवानंतर डॉक्टरच अशी व्यक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीला नवीन जन्म देते किंवा मृत्युच्या दाढेतून परत आणू शकते. दरवर्षी 1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ (National Doctor’s Day 2021 ) साजरा केला जातो. देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो. त्यांचा वाढदिवस आणि पुण्यतिथी दोन्ही याच तारखेला असतात. डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला, तर मृत्यू 1 जुलै 1962 रोजी झाला. केंद्र सरकारने 1991 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली.
प्रत्येकाला आयुष्यात डॉक्टरांचे नेमके काय महत्त्व आहे हे ठावूकच आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर डॉक्टरांनी केलेले काम पाहून त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. प्राचीन काळापासून भारतात वैद्यकीय परंपरा आहे, ज्यामध्ये धन्वंतरी, चरक, सुश्रुत, जीवका इत्यादी आहेत. धन्वंतरीची देवता म्हणून पूजा केली जाते.
अशाप्रकारे 1 जुलै रोजी लोकांना डॉक्टरांच्या कार्याबद्दल जागरूक केले जाते. तसेच, जीवनातील डॉक्टरांच्या योगदानाचे कौतुक केले जाते. तर उद्याच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images, Quotes शेअर करून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरांना शुभेच्छा देऊ शकता.
'एक डॉक्टरच अशी व्यक्ती आहे जी, रडत येणाऱ्याला हसवत परत पाठवू शकते'
डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
'डॉक्टरांनी आपल्या आयुष्यात आरोग्याचा आनंद आणल्यानेच हे जग राहण्यासाठी उत्तम व आरोग्यदायी स्थान बनले आहे'
डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
'डॉक्टरांच्या मेहनतीसाठी रुग्ण त्यांना पैसे देतात, मात्र त्यांच्या दयाळूपणाचे कर्ज प्रत्येक रुग्णावर असते'
डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
'कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे राहिलेल्या सर्व डॉक्टरांना सविनय प्रणाम'
सर्व डॉक्टरांना मनापासून धन्यवाद!
'एक उत्तम डॉक्टर हा कमीतकमी औषधे देतो'- बेंजामिन फ्रँकलिन
डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
'औषधे रोग बरे करतात, परंतु केवळ डॉक्टरच रूग्णांना बरे करु शकतात'- कार्ल जंग
डॉक्टर दिनाच्या खूप शुभेच्छा!
दरम्यान, विधानचंद्र राय हे लोकांसाठी एक आदर्श आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी त्यांनी नि:स्वार्थपणे जखमी आणि पीडितांची सेवा केली होती. डॉक्टर दिन साजरा करण्यामागील हेतू म्हणजे समाजातील डॉक्टरांबद्दल सहानुभूती व्यक्त करून त्यांचा सन्मान करणे हा आहे. शेतकरी आणि जवानांप्रमाणेच जगात डॉक्टरांची भूमिका खूप महत्वाची आहे, त्यांच्याशिवाय समाजाची कल्पना करणे अशक्य आहे.