Happy Dhanteras 2020 Messages: धनत्रयोदशीला खास SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा दिवाळीचा सण
तब्बल 5 दिवस हा सण साजरा केला जातो. या पाच दिवसांमध्ये धनत्रयोदशीला (Dhanatrayodashi) विशेष महत्व आहे. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते
हिंदू धर्मामध्ये संपूर्ण वर्षात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी (Diwali 2020). तब्बल 5 दिवस हा सण साजरा केला जातो. या पाच दिवसांमध्ये धनत्रयोदशीला (Dhanatrayodashi) विशेष महत्व आहे. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. या दिवशी व्यापारी लोक आपल्या दुकानांमध्ये लक्ष्मीची पूजा करतात, तर शेतकरी वर्ग आपल्या अवजारांची पूजा करतो. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. याच दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरीचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्यामुळे या दिवशी धन्वंतरीचीही पूजा केली जाते.
धनत्रयोदशीला नवीन खरेदी करण्याचा प्रथा आहे. या दिवशी सोने, चांदी, नाणी किंवा धातू खरेदी करतात. अशाप्रकारे या दिवशी घरात चांगले आरोग्य नांदावे आणि त्याच्या बरोबरीने पैशांची बरकत व्हावी याकरिता प्रार्थना केली जाते. तर अशा या खास दिवसाचा शुभेच्छा तुम्ही SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status, Wishes, Messages च्या माध्यमातून देऊ शकता.
लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख-समृद्धी व शांती घेउनी
तुमच्या कुटुंबावर राहो धन्वंतरीचा हात, आनंदाने उजळू दे दिवाळीचे पर्व खास धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असो
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
ही दिवाळी आपणांस आणि आपल्या कुटुंबास
आनंदाची आणि भरभराटीची जाओ
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या सदिच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्वंतरीच्या कृपेने उत्तम आरोग्याचे वरदान मिळो
लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्याची बरसात होवो
यमाच्या कृपेने मृत्यूही दूर पळो
धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपणाला सुख शांती, समाधान लाभो!
दिवाळी अशी खास, घरात राहो सदैव लक्ष्मीचा निवास
मिळो धन्वंतरीच्या कृपेचा लाभ, सोबत दीर्घायुष्याची साथ
धनधान्याची बरकत होऊ दे, फराळाचा गोडवा अखंड टिकूदे
उजळूदे जीवन लक्ष लक्ष दिव्यांनी, हीच सदिच्छा प्रभूचरणी
धनत्रयोदशीच्या मनापासून शुभेच्छा!
(हेही वाचा: शुभ आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या धनतेरस सणाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' 10 वस्तूंची खरेदी)
दरम्यान, या दिवशी यमाची पूजा करून त्यासाठी दीप प्रज्वलित करतात म्हणून या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. अशा प्रकारे धनत्रयोदशीला आर्थिक परिस्थितीसाठी माता लक्ष्मी, आरोग्यासाठी धन्वंतरी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून यमाची प्रार्थना केली जाते.