Happy Daughters Day 2020 Wishes in Marathi: राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन लाडक्या मुलीसोबत साजरा करा दिवस!

या दिनानिमित्त तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीला राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिला हे शुभेच्छा संदेश पाठवून तिचा हा दिवस खास करा.

Daughters Day 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

Daughters Day 2020 Wishes in Marathi: असं म्हणतात मुलगा हा वंशाचा दिवा असतो तर मुलगी ही त्या दिव्यातील पणती आहे. म्हणूनच ज्या घरात मुलीचे खळखळून हास्य ऐकू येते त्या घरात कधीच वास्तुदोष नसतो. मुलीला अनेक नाती सांभाळायची असतात. त्यात आई, बहिण, पत्नी, सून ही नाती तिला जबाबदारीपूर्ण सांभाळायची आहे असे लहानपणापासूनच सांगितले जाते. मात्र या सर्वात ती कुणाची तरी लाडकी लेक असते हे आपण विसरूनच जातो. अशा आई-वडिलांच्या लाडक्या लेकीचा सन्मान करण्यासाठी देशभरात 27 सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय कन्या दिवस' (National Daughters Day) म्हणून साजरा केला जातो. मुलगी हा परमेश्वराचा आशीर्वाद असतो, असे मानले जाते. त्यामुळे वर्षातील एक दिवस तिच्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.

दरम्यान, विविध देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. भारतात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी कन्या दिन साजरा करण्यात येतो. म्हणून या दिनानिमित्त तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीला राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिला हे शुभेच्छा संदेश पाठवून तिचा हा दिवस खास करा.

कुणाची ती बहिण असते

कुणाची ती आई असते

कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते

पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- National Daughters Day 2020 Messages: राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त मराठमोळे संदेश, Wishes, Images, Greetings शेअर करुन लाडक्या लेकीची दिवस करा स्पेशल!

लक्ष्मीच्या पायांनी जी घरात येते

जिच्या पैंजणांनी सारे घर निनादते

जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते

जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते

हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते

ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

पोटातच मारले जाते ज्या गोंडस मुलीला

जन्मू द्या त्या चिमुकलीला

तिच वाढवते तुमचा वंश

पाहा देवाची ही अजब लिला

राष्ट्रीय कन्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा

Daughters Day 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

लेक म्हणजे ईश्वराची देणं

लेक म्हणजे अमृताचे बोल

तिच्या पाऊलखुणांनी

सुख ही होई अनमोल

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

मी नसेल आई दिवा वंशाचा

मी आहे दिव्यातील वात

नाव चालवेन कुळाचे बाबा

मोठी होऊनी जगात

राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून तुमच्या मुलीलाही तुमचा अभिमान वाटेल. मुलींचे महत्त्व लोकांना पटावे, स्त्रीभृण हत्या थांबावी या प्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. त्यामुळे त्याची चांगली सुरुवात तुम्ही या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून करण्यास काही हरकत नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif