Happy Children's Day 2022 Messages: बालदिनानिमित्त Wishes, SMS, Quotes, Images द्वारे द्या खास शुभेच्छा!

Happy Children's Day 2022 Messages (PC - File Image)

Happy Children's Day 2022 Messages: भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. भारतात 1956 पासून बालदिन साजरा केला जात होता, पण पूर्वी तो 20 नोव्हेंबरला साजरा केला जात होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांची जयंती भारतात बालदिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली. तेव्हापासून भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. मुलांवरील प्रेमामुळे त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते.

या दिवशी शाळेत मुलांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी मुलांना त्यांचे हक्क सांगितले जातात. देशातील मुले हे देशाचे भविष्य आहेत, मुलांना चांगले शिक्षण दिले नाही तर देशाचे भविष्यही अंधारात जाईल. बालदिनानिमित्त Wishes, SMS, Quotes, Images द्वारे तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियावर खास शुभेच्छा देऊ शकता.

जगातील सर्वात चांगला वेळ,

जगातील सर्वात चांगला दिवस,

जगातील सर्वात सुंदर क्षण

फक्त बालपणीच मिळतात.

Happy Children’s Day.

Happy Children's Day 2022 Messages (PC - File Image)

सकाळ नाही, संध्याकाळ नाही

चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता

रम्य असा लहानपणीचा काळ होता

बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Children's Day 2022 Messages (PC - File Image)

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..

बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!

बालपणीच्या आठवणीत हरपते मन..

येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण…

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy Children's Day 2022 Messages (PC - File Image)

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,

मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती,

मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,

कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,

या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Children's Day 2022 Messages (PC - File Image)

मनाची निरागसता,

ह्रदयाची कोमलता,

ज्ञानाची उत्सुकता,

भविष्याची आशा…

उद्याचा देश घडविणाऱ्या

बालगोपाळांना बालदिनाच्या शुभेच्छा !

Happy Children's Day 2022 Messages (PC - File Image)

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यामागचे कारण म्हणजे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना मुलांबद्दल खूप प्रेम होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंडित नेहरूंचे प्राधान्य मुलांच्या शिक्षणाला होते. मुलांसाठी चांगले काम करणे हा त्यांचा अजेंडा होता. मुलंही त्यांना चाचा नेहरू म्हणायची.