Happy Buddha Jayanti Messages in Marathi: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा, Wishes, Quotes आणि Greetings शेअर करुन साजरी करा बुद्ध जयंती!

Happy Buddha Jayanti Messages 2021: बुद्ध पौर्णिमेनिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि WhatsApp Stickers तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देऊ शकता.

Buddha Purnima Messages 2021 | File Image

Happy Buddha Jayanti Messages in Marathi: राजा शुद्धोदन आणि राणी मायावती यांना इ.स.पूर्व 563 मध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी त्या मुलाचे नाव 'सिद्धार्थ' उर्फ 'गौतम' असे ठेवले. आपला पुत्र चक्रवर्ती राजा व्हावा, अशी राजा शुद्धोदन यांची इच्छा होती. मात्र हा राजकुमार मानवजातीला ज्ञान देणारा धर्मप्रवर्तक होईल, असे सिद्धार्थचे भविष्य वर्तवण्यात आले होते. ही भविष्यवाणी खोटी ठरावी म्हणून राजा शुद्धोदन यांनी पुष्कळ प्रयत्न केले. पण त्यास यश आले नाही. अत्यंत दयाळू असणारा सिद्धार्थ मोठेपणी 'गौतम बुद्ध' झाला. बुद्ध म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे असा व्यक्ती. बुद्धाला ज्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले त्या दिवशी 'वैशाख पौर्णिमा' होती. त्यामुळेच पुढे वैशाख पौर्णिमा 'बुद्ध पोर्णिमा' म्हणून साजरी केली जावू लागली. यंदा 26 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. हिंदु धर्मात गौतम बुद्धांना दशावतारातील नववा अवतार मानले जाते.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes आणि WhatsApp Stickers तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देऊ शकता.

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

अवघ्या जगाला अहिंसा, सत्य

क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या

गौतम बुद्धांना जयंती निमित्त अभिवादन!

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Messages 2021 | File Image

बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Messages 2021 | File Image

शांती चा वास व्यक्तीच्या हृदयातच असतो

याला बाहेर शोधून फायदा नाही.

नमो बुद्धाय!

बुद्ध पौर्णिमेच्या भक्तीमय शुभेच्छा!

Buddha Purnima Messages 2021 | File Image

बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

Buddha Purnima Messages 2021 | File Image

पापाला सदाचाराने

लोभाला दानाने आणि

असत्याला सत्याने

जिंकता येते

बुद्ध पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Buddha Purnima Messages 2021 | File Image

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा:

सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Buddha Purnima Stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या आईला पाठवा.

गौतम बुद्धांनी आयुष्यभर लोकांना प्रेम, अहिंसा, शांती, दु:खातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला. यामुळेच भारत आणि भारताबाहेरील देशांतही बुद्धांचे अनेक अनुयायी आहेत.