Happy Akshay Tritiya 2021 Images: अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes, Messages, HD Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस

यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.

Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

Happy Akshay Tritiya 2021 HD Images: दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला सूर्य आणि चंद्र यांचा उच्च प्रभाव असतो आणि जेव्हा त्यांचे तेज सर्वोच्च असते, तेव्हा हिंदू दिनदर्शिकेनुसार ती तारीख अत्यंत शुभ मानली जाते. या शुभ तारखेला अक्षय तृतीया किंवा आखा तीज असे म्हणतात. यावर्षी 14 मे रोजी अक्षय तृतीया साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शुभ कार्य केले जातात.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोनं खरेदी केल्याने समृद्धी येते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. अक्षय तृतीया ही एक शुभ तारीख आहे. ज्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी तसेच नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी पंचांग पाहण्यासाठी शुभ मुहूर्त काढण्याची गरज नसते. अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes, Messages, Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा - Akshay Tritiya 2021: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोनं; जाणून घ्या सविस्तर)

ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला

नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो

हीच आमची कामना

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

आपणास व आपल्या कुटुंबास

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा!

Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,

सुख, समाधान घेऊन येवो..

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो,

तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो,

अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा…!

Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,

लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो..

शुभ अक्षय तृतीया !

Akshay Tritiya 2021 HD Images (PC - File Iamge)

दरम्यान, लग्न, गृहप्रवेश अशी शुभ कार्ये या तारखेला पंचांग न पाहता करता येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा पाठ आणि हवन इत्यादी कार्य करणं शुभ मानलं जातं.