Haldi Kunku Rangoli Designs
Haldi Kunku Rangoli For Makar Sankranti 2023: नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांती जवळ आला आहे. सध्या महिलांची मकर संक्रांतीची लगबग पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला महिलांसाठी असलेला खास कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू, कोणती साडी नेसायची, खायला काय बनवायचं इत्यादीच्या तयारीसाठी महिला लागल्या असतील, दरम्यान, सण असेल तर घर सजावट आलीच, मकर संक्रांतीच्या सणाला काही दिवस शिल्लक असतांना अनेक ठिकाणी  आत्तापासून घराची साफसफाई केली जात आहे. या यादीत रांगोळीचेही खास महत्व आहे. हिंदू धर्मात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. दरम्यान, आम्ही मकर संक्रांतीला काढता येतील असे खास रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुंदर रंगोली काढू शकता.

पाहा रांगोळीच्या सुंदर डिझाईन

हटके रांगोळी डिझाईन 

झटपट काढा आकर्षक रांगोळी डिझाईन 

आकर्षक रांगोळी डिझाईन 

सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन 

व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकता, नवीन वर्षातल्या  पहिल्या सणासाठी खास रांगोळी काढून मकर संक्रांती हा सण उत्साहाने साजरा करा, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!