Haldi Kunku Last Date: यंदा रथसप्तमी कधी? जाणून घ्या हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्याची शेवटची तारीख
कारण पुढील आठवड्यात रथसप्तमी आहे, जाणून घ्या तारीख
Haldi Kunku Last Date: मकर संक्रांतीपासून सुरु झालेले हळदी कुंकूचे कार्यक्रम पुढे रथ सप्तमी पर्यंत सुरु राहतात. हळदी कुंकूच्या कार्यक्रमात महिला हळदी कुंकुच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. महिला एकमेकांच्या घरी जातात. हळदी कुंकू चा कार्यक्रम कधी पर्यंत करता येणार त्या तारखेची महिती अनेकांना नसणार दरम्यान, तुम्ही अजून हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित केला नसेल तर शक्यतो आज महिलांना बोलवून कार्यकम करा. कारण पुढील आठवड्यात रथसप्तमी आहे. हळदी कुंकूचा कार्यक्रम रथ सप्तमी पर्यंत करता येतो.
हळदी कुंकू करण्यासाठी शेवटची तारीख:
हळदीकुंकूचा कार्यक्रम हा येत्या शुक्रवारी 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. उदय तिथीनुसार रथ सप्तमी ही 16 फेब्रुवारीला आहे. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीनुसार 15 फेब्रुवारीला सकाळी 10.12 पासून दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी सकाळी 8.54 पर्यंत असणार आहे.
रथ सप्तमीची पूजा विधी:
रथसप्तमी हा दिवस सूर्य देव, भगवान सूर्य यांना समर्पित आहे. या दिवसाला अचला सप्तमी आणि सूर्य सप्तमी असेही म्हणतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला हा सण साजरा केला जातो. रथसप्तमीला भगवान सूर्याची पूजा केली जाते. रथ सप्तमीच्या दिवशी स्नान करण्यासाठी सकाळी 05:17 ते 06:59 हा शुभ मुहूर्त असणार आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावा. अक्षदा, फुले वाहावी. रथसप्तमीला ब्रह्म योग आणि इंद्र हे शुभ योग असणार आहे. या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही सूर्याची पूजा केल्यास जास्त चांगले फळ मिळेल.