Hajj 2020: 'Muslim 3D' सोबत आता हज यात्रेचा अनुभव आता व्हर्च्युअल टूर माध्यामातूनही घेता येणार!
Muslim 3D हे त्याचं नाव असून एखाद्या व्हिडिओ गेमप्रमाणे दिसत असले तरीही याच्या माध्यामातून भाविकांना व्हच्युअल टूर घडवली जाणार आहे.
यंदा कोरोना संकटाचा फटका हज यात्रेलाही बसला आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदा इस्लामिक धर्मियांच्या या पवित्र यालेला सौदी अरेबिया वगळता इतर भाविकांना प्रवेश नसेल. मात्र प्रगत तंत्रज्ञाच्या मदतीने यंदा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी जर्मन कंपनीने डिजिटल हज अनुभव आणला आहे. Muslim 3D हे त्याचं नाव असून एखाद्या व्हिडिओ गेमप्रमाणे दिसत असले तरीही याच्या माध्यामातून भाविकांना व्हच्युअल टूर घडवली जाणार आहे. त्यामध्ये इस्लामिक लाईफ स्टाईल, इतिहास, प्रथा परंपरा यांचा समावेश असेल. Hajj Mubarak 2020 Wishes: हज मुबारक WhatsApp Messages, Quotes,Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून प्रियजणांना द्या शुभेच्छा !
दरवर्षी लाखो लोक मक्का मध्ये येतात. 5 दिवस आराधना करतात. शारिरीक आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर नसलेल्यांनी किमान आयुष्यात एकदा हज यात्रा करावी असं कुराण मध्ये सांगितले आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष जगभरातून लाखो भाविक हज यात्रेमध्ये सहभागी होतात. सध्या कोरोना व्हायरसची जगभर दहशत असल्याने 2.5 मिलियन ऐवजी अवघ्या दहा हजार भाविकांच्या उपस्थितीमध्ये हजा यात्रा 2020 ला सुरूवात झाली आहे.
जर्मन कंपनी Bigitec ने Muslim 3D ही व्हर्चुअल टूर डिझाईन केली आहे. Bilal Chbib या कंपनीच्या डायरेक्टरचा व्हिडिओ गेम बनवण्याचा अनुभव होता. दरम्यान 10 वर्षांपूर्वी त्यांच्या मनात अशाप्रकारे व्हच्युअल टूर बनवण्याचा विचार येऊन गेला होता. सध्या कोरोना संकटकाळातील संधीचा वापर करून त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
इस्लामिक धर्मातील महत्त्वाचा आधार असलेल्या हज यात्रेला त्यांनी व्हिडिओ गेम बनवण्याच्या त्यांच्या शास्त्राने बनवलं. दरम्यान आता हा अनुभव भाविक प्रत्यक्षात घेऊ शकतात. ही व्हर्च्युअल टूर यात्रेला पर्याय असू शकत नाही पण निदान लोकांना या यात्रेचा अनुभव देता येईल असं मत Bilal Chbib यांनी euronews शी बोलताना मांडलं आहे.