Guru Purnima 2022 Wishes in Marathi: गुरु पौर्णिमा शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages च्या माध्यमातून शेअर करत गुरूजनांना करा अभिवादन

तुमच्या आयुष्यात गुरूस्थानी असणार्‍या या सार्‍या वंदनीय व्यक्तिमत्त्वाला आज गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Facebook Messages, Quotes सोशल मिडीयामध्ये शेअर करत देऊ शकता.

गुरू पौर्णिमा । File Image

Happy Guru Purnima Marathi Wishes: आई-वडीलांनंतर आपल्या आयुष्याला वळण देणारं महत्त्वाची व्यक्ती म्हणजे गुरू. आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरूचं रूप बदलतं पण त्याचं असणं तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. म्हणूनच आयुष्यात गुरूरूपी असणार्‍या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला आज व्यास पौर्णिमा (Vyas Purnima) अर्थात गुरू पौर्णिमेच्या (Guru Purnima) निमित्ताने वंदन करायला विसरू नका. आषाढ पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मिय गुरू पौर्णिमा म्हणून साजरी करतात. यंदा हा गुरू पौर्णिमेचा सण 13 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. मग तुमच्या आयुष्यात गुरूस्थानी असणार्‍या या सार्‍या वंदनीय व्यक्तिमत्त्वाला आज गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Facebook Messages, Quotes सोशल मिडीयामध्ये शेअर करत देऊ शकता. गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंना थेट भेटणं शक्य नसल्यास व्हर्च्युअल जगात त्यांच्याप्रति आदर व्यक्त करून तुमचा दिवस खास करू शकता.

शाळा-कॉलेजेस मध्ये गुरू पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस शिक्षकांसाठी खास केला जातो. कला क्षेत्रातही गुरू पौर्णिमेचा दिवस खास अंदाजात साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने गुरूला आपल्या कलेच्या माध्यमातून गुरू दक्षिणा दिली जाते. मग खास शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून सोशल मीडीयात शुभेच्छा देण्यासाठी ही ग्रिटिंग्स तुम्ही नक्की शेअर करू शकता. नक्की वाचा: Guru Purnima 2022 Date: गुरु पौर्णिमा यंदा 13 जुलै दिवशी, जाणून घ्या तिथी वेळ, महत्त्व ! 

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

 

गुरू पौर्णिमा । File Image

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरू पौर्णिमा । File Image

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,

गुरु देवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः

गुरू पौर्णिमा । File Image

आधी गुरुसी वंदावे,

मग साधन साधावे,

गुरु म्हणजे माय बाप

नाम घेता हरतील पाप

गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!

गुरू पौर्णिमा । File Image

गुरू परमात्मा परेषू

गुरू पौर्णिमेनिमित्त गुरूस्थानी असलेल्या

सार्‍यांना विनम्र वंदन!

गुरू पौर्णिमा । File Image

गुरू जगाची माऊली

जणू सुखाची सावली

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हटले जाते. या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. गुरू पौर्णिमेदिवशी अध्यात्म क्षेत्रात काम करणार्‍या गुरूंनाही वंदन केले जाते. अनेक मंदिरांमध्येही गुरू पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची रीत आहे.