Guru Purnima 2020 Marathi Songs: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबांची 'ही' खास मराठी गाणी आणि भजने (Watch Video)

तर गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर मार्ग दाखवणाऱ्या गुरुंना वंदन केले जाते.

Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in)

Guru Purnima 2020 Marathi Songs: भारतात येत्या 5 जुलै रोजी सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येणार आहे. तर गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर मार्ग दाखवणाऱ्या गुरुंना वंदन केले जाते. गुरुंनी दाखवलेल्या मार्गामुळेच आपण आयुष्यात समाधानी आणि यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करतो. देशातील विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरा करण्याची विविध पद्धत असेल. परंतु यंदाच्या गुरुपौर्णिमेवर कोरोनाचे सावट आल्याने मोठ्या उत्साहात ती साजरी करता येणार नाही आहे. याच दरम्यान, गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रातील शिर्डी येथील प्रसिद्ध अशा साईबाबांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होती. परंतु या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त यंदा शिर्डीमधील साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांना जाता येणार नाही आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिर्डीतील साईबाबांचे मंदिर 17 मार्च पासूनच साईभक्तांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव साईमंदिरात भाविकांशिवाय पार पडणार आहे. मात्र तुम्ही नाराज होण्याची काहीच गरज नाही आहे. कारण गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांची 'ही' खास गाणी आणि भजने ऐकून भक्तीमय वातावरणात दंग व्हा.(Shirdi Guru Purnima 2020 Utsav: साईबाबा संस्थानचे यंदा गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त रक्तदान, प्लाझ्मा दानचं आवाहन; रथ, पालख्या मिरवणूक रद्द) 

>>साई बाबा आलो तुझ्या दर्शनाला

>>उठा उठा सकल

>>जाऊया पाई शिर्डीच्या थाई

>>लिंबाखाली प्रकट झाला

>>पालखी निघाली साईंची

भक्तिरसाने न्हाऊन निघालेली ही गाणी आपल्याला साईचरणी लीन करतील. आज गुरुपौैर्णिमे दिवशी साईंना स्मरताना ही गाणी आपल्याला भक्तिमय करुन टाकतील. ही गाणी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि साईंना स्मरून आजची गुरुपौर्णिमा खास करा



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif